गुहागर, ता. 03 : तालुक्यातील चिंद्रवळे येथील रुग्णसेवक श्री. मनोज डाफळे हे कोरोना काळापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असून, गरजू रुग्णांना सातत्याने मदतीचा हात देत आहेत. गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांतील रुग्णांना वैद्यकीय मदत आवश्यक असल्यास ते तत्परतेने सहकार्य करतात. कोकणातील १२ दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ ३० ऑगस्ट रोजी करण्यात आला. Wheelchair distribution to the disabled
वैद्यकीय सेवेसोबतच क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातही डाफळे यांचे योगदान आहे. विरार-नालासोपारा परिसरातील कोकणवासीयांना मदत करताना रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेची गरज जाणवली. ही गरज गुहागर तालुक्याचे सुपुत्र व वरळीचे माजी नगरसेवक श्री. दत्ता नरवणकर यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. तसेच कोकणातील गरीब व गरजू रुग्णांसाठी डाफळे विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, त्यांच्या सेवाभावी कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. Wheelchair distribution to the disabled

या उपक्रमाला व्हीलचेअर सौजन्य देणारे श्री. प्रशांत दादा केळसकर (गुहागर तालुका सुपुत्र, समाजसेवक) याचे बंधू प्रकाश दादा, विरार शिवसेना शहर प्रमुख श्री. उदय दादा जाधव, गुहागर तालुका सुपुत्र माजी पोलीस उपनिरीक्षक श्री मनोहर गुरव, स्वामी छाया ट्रॅव्हल्स मालक श्री अक्षय जाधव, शिवसेना शहरप्रमुख. श्री उदय दादा जाधव, समाजसेवक श्री मिलेश जाधव, मनसे पदाधिकारी श्री.अशोक कांबळे, समाजसेवक श्री मंगेश किजबिले, पत्रकार श्री अमोल पवार, भजन मंडळ पदाधिकारी जोगळे, नर्स नमिता गोणबरे, शाहीर सुधाकर गोणबरे, शाहीर अमित पेजले, विजय घाणेकर, आनंद नाचरे, विनायक वाघे विलास गुरव, श्रीमती निर्मला तानाजी डाफळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. Wheelchair distribution to the disabled
