टाकी त्वरीत जमीनदोस्त करण्याबाबत मनसे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांची मागणी
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील गिमवी मधील मोरेवाडी येथील जुनी पाण्याची साठवण टाकी धोकादायक अवस्थेत असून सदरची पाण्याची साठवण टाकी ग्रामपंचायतने त्वरीत जमीनदोस्त करावी. भविष्यात साठवण टाकी कोसळून जीवितहानी झाल्यास त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहील, असा इशारा मनसे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी दिला आहे. Water storage tank dangerous
गिमवी येथील प्रकाश केशव मोरे यांच्या घराजवळ व दर्शना जाधव यांच्या जमिनीत अनेक वर्षापूर्वी ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्याची साठवण टाकी बांधण्यात आली होती. सदरची टाकी जीर्ण झाल्यामुळे केव्हाही कोसळून भीषण अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. अनेक वर्षांपूर्वी बांधलेली टाकी प्रकाश मोरे यांच्या अगदी घराजवळ आहे. साठवण टाकी खुप जुनी व जीर्ण झाल्यामुळे त्यातील सिमेंटचे तुकडे खाली पडत आहेत. सळ्याही गंजून गेल्या आहेत. साठवण टाकीची दुरावस्था झाल्यामुळे या टाकीमध्ये येणारे पाणी वाया जात आहे. Water storage tank dangerous
यामुळे या परिसरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही अशी तक्रार येथील ग्रामस्थांची आहे. सदरची साठवण टाकी केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. येथील ग्रामस्थ प्रकाश केशव मोरे व अन्य नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे लेखी निवेदन देऊन सुद्धा कुणीही या संदर्भात दखल घेतलेली नाही. या जीर्ण झालेल्या टाकीच्या जवळ वनिता शितप यांचे हि घर आहे. हे घर प्रकाश मोरे यांच्या घराच्या बाजूला असून साठवण टाकीच्या शेजारून नागरिकांसाठी येण्या जाण्याची वाट आहे. ती टाकी नैसर्गिक रित्या पडल्यास नागरिकांना धोका उद्भभवू शकतो. नैसर्गिक आपत्तीमध्ये साठवण टाकी जमीन दोस्त झाल्यास येथील काही घरांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या घरातील नागरिकांची जिवीतहानी होऊ शकते. असे मनसे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी यांनी म्हटले आहे. Water storage tank dangerous