नीलेश सुर्वे यांचा पत्रकार परिषदेतून इशारा
गुहागर, ता. 01 : महायुतीद्वारे मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लुटण्याचा राजकीय खेळ आमदार जाधव यांनी करु नये. आजपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी यांच्या कामावर टिकाटिप्पणी केली नव्हती मात्र आता पुरावे समोर ठेवून, चुकीच्या गोष्टींचे जाहीर खंडन आम्ही करणारच. तुम्ही टपली मारा, टिचकी मारा त्याचे उत्तर द्यायला गुहागर भाजप सक्षम आहे. अशा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेतून दिला. Warning from Nilesh Surve’s press conference
गुहागर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 1 कोटी 55 लाखांचा निधी जिल्हा नियोजनमधुन मंजूर करण्यात आला. गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या या कामांच्या मंजुरीसाठी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार विनय नातू, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भाजप कार्यकर्त्यांनी ही कामे आम्ही मंजूर करुन आणल्याची माहिती प्रसिध्द केली. त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहून ही कामे आपणच मंजूर करुन आणल्याचे सांगितले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी आज शृंगारतळी येथे पत्रकार परिषद घेवून तीव्र शब्दात आमदार भास्कर जाधव यांच्यावर टिका केली. Warning from Nilesh Surve’s press conference
नीलेश सुर्वे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक सदस्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी 50 लाखाचा निधी देण्याचे आश्र्वासन दिले होते. त्याप्रमाणे मी स्वत: 11.8.2023 रोजी कामांची यादी दिली होती. तसेच जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार विनय नातू, मंत्री रवींद्र चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी विविध विकास कामे सुचविली होती. यापैकी 15 गावांमधील 20 कामांना पालकमंत्री सामंत यांनी 23.1.2024 रोजी 1 कोटी 55 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. पैकी मळण व तवसाळ तांबडवाडी येथील कामांसाठी आमचे शिफारस पत्र होते. ही कामे मंजूर झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते आनंदी झाले. परंतू आमदार भास्कर जाधव ही कामे मीच मंजुर केल्याची पत्रे पाठवून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. यापूर्वीही मुंढर व पोमेंडी आडेवाडी येथील कामांचे श्रेय लाटण्याचे काम केले. Warning from Nilesh Surve’s press conference
एकेकाळी उत्कृष्ट संसदपटु म्हणून नावलौकिक कमावणारे, 200 कोटींची विकास कामे आणल्याचे जाहीर करणारे आमदार भास्कर जाधव आज दुसऱ्याने आणलेल्या कामांचे श्रेय लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगले झाले की मी केले आणि खराब झाले की भाजपवाल्याचे ही त्यांची दुटप्पी भुमिका गुहागर विजापूर महामार्ग, जलजीवनच्या कामातून पुढे येत आहे. कोणतेही काम गुणवत्तापूर्वक होईल याची जबाबदारी आमदार म्हणून त्यांची नाही का असा प्रश्र्न पडतो. राजकीय खेळ करुन तालुक्यातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा सन २०२३/२४ ग्रामपंचायतींना जनसुविधासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत आणलेल्या 1 कोटी 55 लाखाची कामे कोणी व कशी आणली याचा खुलासा त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थित आमच्यासमोर करावा. महायुतीकडून विकास कामांचा ओघ असाच सुरु रहाणार आहे. Warning from Nilesh Surve’s press conference
अजूनही 40 लाखांची कामे मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. आचार संहिता लागण्यापूर्वी आणखी काही कामांची त्यात भर पडेल. या पत्रकार परिषदेला उत्तर रत्नागिरी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल भालेकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिनेश बागकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. Warning from Nilesh Surve’s press conference