गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वरचापाठ मोहल्ला येथून इब्राहिम माहीमकर यांच्या मालकीची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार गाडी क्रमांक एम एच ०५ ए बी ५४७५ या क्रमांकाची गाडी त्यांच्या घराजवळ उभी असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या गाडीची किंमत ७० हजार रुपये असल्याचे त्यांनी तक्रारीत सांगितले आहे. हा प्रकार २६/०५/२०२४ रोजी रात्री २३. २० ते २७/ ५/ २०२४ रोजी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. Wagoner car stolen from Guhagar
या बाबतची तक्रार त्यांनी दिनांक २९/ ५/२०२४ रोजी गुहागर पोलीस स्टेशन ठाणे येथे नोंदविली. भा. दं. वि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गुहागर पोलीस करीत आहेत. गुहागरमध्ये गेल्या महिन्यांमध्ये अनेक चोरींचे प्रकार घडले असून पोलिसांसमोर मोठे आव्हानच उभे राहिले आहे. Wagoner car stolen from Guhagar