• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

व्याडेश्र्वर देवस्थान भक्तनिवास बांधणार

by Mayuresh Patnakar
February 26, 2025
in Guhagar
97 1
0
Vyadeshwar Temple to build a devotee residence
191
SHARES
546
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाशिवरात्रीच्या निमित्ताने संकल्प चित्राचे अनावरण

गुहागर, ता. 26 : शहरातील व्याडेश्र्वर देवस्थान आता भक्तगणांच्या निवासासाठी सर्वसोयीनींयुक्त असा भक्तनिवास बांधणार आहे. वाहनतळ, भोजनालय, भक्तनिवास आणि मंगल कार्यालय असलेल्या इमारतीच्या संकल्पचित्राचे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अनावरण करण्यात आले. Vyadeshwar Temple to build a devotee residence

यासंदर्भात बोलताना श्रीव्याडेश्र्वर देवस्थानचे कार्यवाह अमरदिप परचुरे म्हणाले की, वाढत्या पर्यटकांमुळे मंदिरात दर्शनाला, धार्मिक कार्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची, भक्तांची संख्या वाढत आहे. मंदिराशेजारी असलेला भक्तनिवास, मंदिराबाहेरील वाहनतळ अपुरा पडत आहे. त्यामुळे देवस्थानने जागा खरेदी करुन भक्तनिवासाची मोठी वास्तू बांधण्याचे नियोजन केले होते. त्यादृष्टीने गेली काही वर्ष तयारी सुरु होती. मात्र देवस्थानलगत जागा मिळत नव्हती. गतवर्षी मकरंद खरे यांच्याकडून देवस्थानला अपेक्षित जागा मिळाली. जागा खरेदीसंदर्भातील तांत्रिकी व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर आता भक्तनिवासाच्या कामाला आम्ही सुरवात करणार आहोत. आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या वास्तुंच्या आराखड्याचे संकल्पचित्र आम्ही प्रसिध्द करत आहोत. Vyadeshwar Temple to build a devotee residence

Vyadeshwar Temple to build a devotee residence

नव्या जागेमध्ये पहिली इमारत ही भक्तनिवासाची असेल. तळमजला अधिक दोन मजल्यांच्या या इमारतीमध्ये तळमजल्यावर वाहनतळ तसेच संस्थेचे कार्यालय, भक्तनिवासाचा स्वागत कक्ष अशी व्यवस्था असेल. तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 14 निवासी खोल्या, प्रत्येक मजल्यावर 8-10 महिला व पुरुष राहु शकतात अशी मोठी खोली आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन सुसज्ज खोल्या अशी भक्तनिवासाच्या इमारतीची रचना आहे. Vyadeshwar Temple to build a devotee residence

Vyadeshwar Temple to build a devotee residence

भक्तनिवासाच्या मागे मोठा हॉल व पहिल्या मजल्यावर भोजन कक्षाची रचना आहे. व्याडेश्र्वर देवस्थानतर्फे दरवर्षी पितृ पंधरवड्यात प्रवचन, किर्तन  याशिवाय वर्षभरात आरोग्य शिबीर, प्रदर्शन असे विविध कार्यक्रम होतात. त्यासाठी 500 व्यक्ती आरामात बसु शकतील असे सभागृह बांधण्यात येणार आहे. याच सभागृहाच्या वर भोजन कक्षासाठीची व्यवस्था आहे. Vyadeshwar Temple to build a devotee residence

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVyadeshwar Temple to build a devotee residenceगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.