• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मतदार यादी विशेष नोंदणी शिबीर

by Manoj Bavdhankar
August 10, 2024
in Politics
119 1
0
New voter registration starts in Guhagar Taluka
234
SHARES
668
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुक्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत

गुहागर, ता. 10 : मा. भारत निवडणूक आयोगाने दि. ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरिक्षणाचा दुसरा कार्यक्रम राबविणेचा सुधारीत कार्यक्रम दि. ०१/०८/२०२४ रोजी जाहीर केला आहे. त्यानुषंगाने गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व राजकीय पक्षाच्या सन्माननीय पदाधिकारी यांची बैठक श्री. शिवाजी जगताप, मतदार नोंदणी अधिकारी, २६४ गुहागर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी खेड यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय गुहागर येथे आयोजित करण्यात आली होती. Voter List Special Registration Camp

गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३२२ मतदान केंद्राचा समावेश आहे. दिनांक ०६/०८/२०२४ रोजी सर्व केंद्राची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती (अर्ज) स्विकारण्याचा कालावधी ०६/०८/२०२४ ते २०/०८/२०२४ असा आहे. त्याअनुषंगाने सदरचे अर्ज स्विकारणे साठी दि. १० ऑगस्ट, २०२४ (शनिवार ), दि. ११ ऑगस्ट २०२४ (रविवार) व दि. १७ ऑगस्ट, २०२४ (शनिवार), १८ ऑगस्ट, २०२४ (रविवार) या चार दिवशी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे उपस्थितीत विशेष शिबीर आयोजित केले आहे. नवीन नाव नोंदणी ( नमुना ६ ), नाव वगळणी ( नमुना ७), दुरुस्ती व दुबार EPIC ( नमुना ८ ) अशा स्वरुपाचे अर्ज भरता येणार आहेत. Voter List Special Registration Camp

या विशेष मोहिमे बरोबरच दि. २०/०८/२०२४ पर्यत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसिल कार्यालय तसेच voters.eci.gov.in या संकेतस्थळावर देखील अर्ज करता येतील. याबाबत राजकिय पक्षाचे उपस्थित पदाधिकारी यांना देखील मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहीती देण्यात आली. तरी जास्तीत जास्त नवमतदारांनी तसेच नागरीकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. शिवाजी जगताप, मतदार नोंदणी अधिकारी, २६४ गुहागर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी खेड यांनी केले. Voter List Special Registration Camp

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarpoliticeUpdates of GuhagarVoter List Special Registration Campगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.