गुहागर, ता. 24 : मतदारांमध्ये मतदानाबाबत जाणीव जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने वेलदूर नवानगर मराठी शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वेलदुर ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी कोळथरंकर, अंजली मुद्दामवार, सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला व शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. Vote Awareness Round at Veldur
त्यावेळी मतदान जनजागृती विषयक घोषवाक्य, तसेच घोषणा देण्यात आल्या. गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 स्विप उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करणे बाबत व मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले होते. सदरची प्रभाग फेरी ही केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम, मुख्याध्यापक मनोज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर व उपाध्यक्ष संजना फुणगुसकर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले. Vote Awareness Round at Veldur