• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुझलॉन पवनवीजनिर्मिती केंद्रास भेट

by Mayuresh Patnakar
February 3, 2024
in Guhagar
90 1
0
Visit to Suzlon Wind Power Plant
176
SHARES
503
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेळणेश्वर महर्षी परशुराम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट

गुहागर, ता. 03 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सातारा जिल्ह्यातील सडावाघापूर, पाटण इथे असलेल्या सुझलॉन कंपनीच्या पवनवीजनिर्मिती केंद्रास शैक्षणिक भेट दिली. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक आणि खरोखर फिल्ड वर्क वरील काम कसे असते हे पाहिल्याशिवाय तंत्रशिक्षणाचा मूळ हेतू साध्य होत नसल्यामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकरीत त्या त्या विषयांच्या अनुषंगाने विविध नामवंत कंपन्यांना औद्योगिक भेटी आयोजित केल्या जातात. विद्युत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास आणि त्यामागचे महत्त्व कळावे या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. Visit to Suzlon Wind Power Plant

Visit to Suzlon Wind Power Plant

भेटीच्या सुरुवातीस सुझलॉन कंपनीमधील सेफ्टी ऑफिसर श्री. अमृत घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर कंपनीमधील अभियंता श्री. मनोहर पवार यांनी त्यांच्या संपूर्ण अभियंता टीमसोबत विद्यार्थ्यांना सपूर्ण कंपनी, पवनचक्कीचे कार्य, कंपनीचे कार्य या सगळ्याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. दुपारी १  वाजता या औद्योगिक भेटीची सांगता करण्यात आली. Visit to Suzlon Wind Power Plant

प्रस्तुत उपक्रमाच्या यशस्वीततेकरिता विद्या प्रसारक मंडळ, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, महाविद्यालयातील वि्दयुत विभागाचे प्रमुख श्री. सतिश घोरपडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच ही भेट घडून येण्याकरिता सुझलॉन कंपनीतर्फे सडावाघापूर येथील प्लॉचे इन्चार्ज श्री. प्रकाश देशमुख यांचेही विशेष सहकार्य लाभले. तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यूत विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्री. योगेश काटदरे यांनी याकरिता विशेष मेहनत घेतली. या भेटीकरिता महाविद्यालयाच्या विद्युत विभागातील २० विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला होता. Visit to Suzlon Wind Power Plant

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVisit to Suzlon Wind Power Plantगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.