विधानसभा समन्वय विपुल कदम यांनी घेतले दर्शन
गुहागर, ता. 28 : मी श्री वराती मातेचा एक सेवक आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त श्री वराती मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. असे शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे नव नियुक्त समन्वयक म्हणून निवड झालेले विपुल कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केली. गुहागर खालचापाट येथील जागृत देवस्थान श्री वराती देवीच्या दर्शनासाठी शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा समन्वयक म्हणून निवड झालेले विपुल कदम हे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष दीपक कनकोटकर व अमरदीप परचुरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati


यावेळी गोयथळे व मोरे मंडळी ग्रामस्थांच्या वतीने विपुल कदम यांना श्री वराती मातेची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन श्री वराती मंदिरात सन्मान करण्यात आला. विपुल कदम हे नवरात्र उत्सवामध्ये श्री वराती देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली तर मी पुन्हा श्री वराती देवीच्या दर्शनासाठी येईन असे म्हटले होते. त्यानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्त विपुल कदम हे बुधवारी रात्री ८ वाजता श्री वराती मंदिरात दर्शनासाठी आले होते. या मंदिरात आल्यानंतर मला खूप समाधान व प्रसन्न वाटते अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati
यावेळी महेंद्र पाटील, तुषार मोरे, विद्याधर गोयथळे, संतोष गोयथळे, उदय पाटील, माजी नगरसेवक अमोल गोयथळे, भरत गोयथळे, सुनील गोयथळे, अनंत पावसकर, तनय गोयथळे, योगेश गोयथळे, सौरभ गोयथळे, यथार्थ मोरे, स्पर्श गोयथळे, पराग भोसले, नयन गोयथळे, रुपेश गोयथळे, जितेंद्र गोयथळे, तेजस गोयथळे, सतीश पाटील, मंगेश पाटील, अरुण पाटील, रिया गोयथळे, शिल्पा गोयथळे, विद्या गोयथळे, आर्वी गोयथळे, ओवी गोयथळे, धनिष्ठा बागकर, मयुरी पाटील, अरुणा पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati