• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 April 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विनोद जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हाध्यक्ष पदी निवड

by Ganesh Dhanawade
July 1, 2023
in Guhagar
112 1
0
Vinod was elected as Deputy District President
220
SHARES
628
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष  पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे  विनोद  जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाली .याचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे  देण्यात आले.  Vinod was elected as Deputy District President

यावेळी बोलताना विनोद  जानवळकर म्हणाले की, राज साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मी मनसे पक्षात आलो, पक्षाने मला  उप तालुका अध्यक्ष,  तालुका अध्यक्ष पद दिले., जनहिताची कामे मी सतत करत होतो, जनतेच्या न्याया साठी सतत लढत राहिलो, नागरिकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो . या पुढेही प्रत्येक जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहीन मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले. आपल्या  कार्यकाळात गुहागर तालुक्यात गोरगरीब जनता त्यांच्याकडे अनेक विषय घेऊन जात होते त्या सर्व विषयाचे सखोल चौकशी करून त्यांना योग्य तो मार्गदर्शन व न्याय देत होते सर्वसमावेशक वृत्ती मुले पक्षाला तालुक्यात एक विशिष्ट वलय प्राप्त करून देण्यात यश आले आहे. अशा असंख्य कामांचा  लेखाजोखा पाहून पक्षाचे अध्यक्ष मा. राजसाहेब  ठाकरे यांनी मला गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्ष पदांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. Vinod was elected as Deputy District President

मनसे चे सरचिटणीस  वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतिश नारकर ,जिल्हा अध्यक्ष  जितेंद्र चव्हाण , गुहागर संपर्क अध्यक्ष  प्रमोद  गांधी यांचे मार्गदर्शन खाली या पुढेही काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Vinod was elected as Deputy District President

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVinod was elected as Deputy District Presidentगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.