गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे विनोद जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाली .याचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले. Vinod was elected as Deputy District President

यावेळी बोलताना विनोद जानवळकर म्हणाले की, राज साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन मी मनसे पक्षात आलो, पक्षाने मला उप तालुका अध्यक्ष, तालुका अध्यक्ष पद दिले., जनहिताची कामे मी सतत करत होतो, जनतेच्या न्याया साठी सतत लढत राहिलो, नागरिकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो . या पुढेही प्रत्येक जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहीन मनसे गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले. आपल्या कार्यकाळात गुहागर तालुक्यात गोरगरीब जनता त्यांच्याकडे अनेक विषय घेऊन जात होते त्या सर्व विषयाचे सखोल चौकशी करून त्यांना योग्य तो मार्गदर्शन व न्याय देत होते सर्वसमावेशक वृत्ती मुले पक्षाला तालुक्यात एक विशिष्ट वलय प्राप्त करून देण्यात यश आले आहे. अशा असंख्य कामांचा लेखाजोखा पाहून पक्षाचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी मला गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्ष पदांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. Vinod was elected as Deputy District President
मनसे चे सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष सतिश नारकर ,जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण , गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचे मार्गदर्शन खाली या पुढेही काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Vinod was elected as Deputy District President
