बदली न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
गुहागर, ता. 09 : जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा मासू नं. 1 या शाळेतील शिक्षक विकास भानुदास बलसेटवार हे शिक्षक दि. 6 जानेवारी 2022 रोजी शाळेत हजर झाले आहेत. सदर शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या कारणावरून अनेक प्रकारच्या शारिरीक शिक्षा करत आहेत. या संदर्भात गटशिक्षधिकारी मान. लीना भागवत मॅडम यांना लेखी/तोंडी स्वरुपाच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच वेळोवेळी फोन व्दारेही सांगण्यात आले. तरी सदर शिक्षकांची तीव्र बदलीची मागणी असूनही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. Villagers protest if the teacher is not transferred
सदर शिक्षक विद्यार्थ्यांला मारहाण करणे, त्याचे रागाने कपडे फाडणे, मानेजवळ हाताने दाबणे, कुचेष्टा करणे, जोराने हाताला धरूण ओढणे, जोराने इजा होईपर्यंत हात दाबणे, पोटात पेन खुपसणे, कानफाटात मारणे, डोक्यात पट्टी मारणे, डोक्यात/डोळ्याच्या शेजारी पेन खुपसण्याचा प्रयत्न करणे, अश्लील बोलणे, चुकीच्या नकला व खाणाखुणा करुन दाखवणे, मुलांच्या तोंडावर वही दाबून ठेवणे, स्वत चा उपवास असल्यास मुलांनाही उपवास धरायला लावणे, हातावर पेनाने इजा करणे, डोके दोन हाताने धरून वर उचलणे, पायात पाय घालून पाडणे अशा अनेक भयानक दुखापत विद्यार्थ्यांना पोहोचू शकणाऱ्या कृती सदर शिक्षक शाळेत आल्यापासून करत आहे. तशा प्रकारच्या लेखी/तोंडी स्वरुपाच्या तक्रारी पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या नावे केल्या आहेत. Villagers protest if the teacher is not transferred


शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालक मेळाव्यात शिक्षकाला समज देण्यात आली परंतू आजपर्यंत कोणताच बदल झालेला नाही. संबंधित शिक्षकाचा काही वर्षापूर्वी अपघात होऊन डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सदर शिक्षक मनोरुग्णासारखा वागत आहे. पालकांनी या संदर्भात गटशिक्षधिकारी मान. लीना भागवत मॅडम यांना लेखी/तोंडी स्वरुपाच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच वेळोवेळी फोन व्दारेही सांगण्यात आले. तरी सदर शिक्षकांची तीव्र बदलीची मागणी असूनही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. Villagers protest if the teacher is not transferred
विकास बलसेटवार सर यांना जोडाक्षर युक्त शब्द फळ्यावर लिहीता येत नाही. शालेय कामकाजामध्येही सदर शिक्षकाचे योगदान दिसत नाही. तरी विकास बलसेटवार यांची बदली करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अन्यथा सदर प्रकरणी शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर मा. गटशिक्षधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यास शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामविकास मंडळ मासू यांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. Villagers protest if the teacher is not transferred