• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी अडूर ग्रामस्थ्यांचे उपोषण

by Ganesh Dhanawade
January 28, 2025
in Guhagar
203 2
1
Villagers on hunger strike for transfer of police inspector

पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीसाठी उपोषणास बसलेले ग्रामस्थ.

399
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : पोलीस प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौध्द विहारला टाळे ठोकणे, सशस्‍त्र पहारा ठेवणे, पुजापाठापासून वंचित ठेवल्याने गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीच्या मागणीसाठी बौध्दजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. 40 च्या ग्रामस्थांनी 26 पासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. गावातील पुरुष, महिला व शाळकरी मुले या उपोषणात सहभागी झाले आहेत. Villagers on hunger strike for transfer of police inspector

धर्मप्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमांना गुहागरच्या पोलीस निरीक्षकांनी जाणिवपूर्वक अटकाव केला. या दिवशी बौध्दविहाराला टाळे ठोकून आम्हाला कार्यक्रम करण्यास मज्‍जाव केला. त्यामुळे आमचा अपमान झाला आहे. आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारींचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक आपल्यावरील आरोप झटकण्यासाठी, आमच्याशी वैचारिक मतभेद असलेल्या आमच्याच समाजबांधवांचा आधार घेवून दोन गटांमध्ये वाद आहेत असे भासविण्याचा केविलवाणा व बालिश प्रयत्न करत आहेत. आमच्या विरोधात एक गट उभा केला.  महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला कोणाचीही तक्रार किंवा हरकत नसताना प्रांत साहेबांची ऑर्डर असल्याने तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही असे धादांत खोटे सांगितले. आम्ही दिलेल्या निवेदनांच्या बातम्या प्रसिध्द होण्याची कुणकुण लागल्यानंतर सारवासारव करण्यासाठी पोलीस निरिक्षकांनी 4 जानेवारीला दोन गटांची बैठक घेणार असल्याचे जाहिर केले. मात्र अशी बैठक जाहीर करण्यापूर्वी आम्हाला विश्र्वासात घेतले नाही. शिवाय 3 जानेवारीला रात्री 11.30 वा. पोलिस पाटीलांकरबी आम्हाला बैठकीचे निमंत्रण दिले. परंतू पक्षपातीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यासोबत कोणतीही चर्चा करणार नाही असे सांगून आम्ही बैठकीस येण्यास नकार दिला. Villagers on hunger strike for transfer of police inspector

Villagers on hunger strike for transfer of police inspector

या संपूर्ण प्रकरणामध्ये गुहागरच्या पोलीस निरिक्षकांची येथून बदली व्हावी, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. या संदर्भातील निवेदन यापूर्वीच जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना दिले आहे. 26 जानेवारीपर्यंत बदली झाली नाही तर बौध्दजन सहकारी संघ अडूर, शाखा क्र. 40 च्या सर्व ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी सकाळपासून गुहागर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहेत. यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील आणि विभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांनी ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले, मात्र, ग्रामस्थांनी जोपर्यंत सचिन सावंत यांची बदली होत नाही, तोपर्यंत उपोषण आम्ही मागे घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. Villagers on hunger strike for transfer of police inspector

या उपोषणामध्ये दिलीप सदाशिव जाधव (अध्यक्ष), विलास नारायण जाधव (सचिव),  सचिन सदानंद जाधव, मनिषा सदानंद जाधव (माजी सरपंच), यशवंत धर्माजी जाधव, दिपक प्रभाकर जाधव, राजेंद्र प्रभाकर जाधव, महेश पवार, प्रमोद जाधव, स्नेहा जाधव, विशाल जाधव, दिनेश सावंत, अशोक गोपाळ जाधव, प्रकाश रामा जाधव, आनंद सदाशिव जाधव, प्रथमेश सदानंद जाधव, निकिता दिलीप जाधव, हेमांगी हेमंत जाधव आदीसह महिला व शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले आहेत. Villagers on hunger strike for transfer of police inspector

Big boost to Maharashtra's development

पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या समर्थनार्थ विभागीय पोलीस अधिकाऱ्यांना काही प्रतिष्ठित नागरिकांनी निवेदन दिले होते. मात्र, त्यांना खरी वस्तुस्थिती कळताच त्यांनी सांगितले की, सदरील निवेदन कोणत्या विषयासाठी वापरण्यात येणार आहे, याची कल्पना नव्हती. आम्ही हे निवेदन तयार केले नसून ते पोलीस खात्याकडून तयार करण्यात आले असून आमच्या त्यावर सह्या घेण्यात आल्याचे ते म्हणाले. Villagers on hunger strike for transfer of police inspector

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVillagers on hunger strike for transfer of police inspectorगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share160SendTweet100
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.