संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली हे गाव पंचक्रोशीतील महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या गावात बँका, पतपेढया, शासकीय कार्यालये, शासकीय व खाजगी रुग्णालये तसेच मुख्य म्हणजे मच्छी मार्केट व भाजी मार्केट चिकन आणि मटन सेंटर मोठमोठी कापड व किराणा दुकाने आशा बाजारपेठेमुळे आणि वाहतुकीच्या सर्व सोयी व औषधोपचाराच्या सर्वसोयी उपलब्ध असल्या तरी अनेक गैरसोयी व शासकीय असुविधांमुळे अन्यायाविरुद्ध ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आबलोली गावातील सर्व समाजातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. Villagers of Aabloli fast to death
१)पोस्ट ऑफीस आबलोली मधील असुविधा २) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गुहागर, शाखा कार्यालय आबलोली ३) बँक ऑफ इंडिया शाखा आबलोली ४) भारत संचार निगम विभाग ५) सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर ६) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गुहागर आगार ७) महसूल विभाग गुहागर ८) जिल्हा परिषद आरोग्य विभाग याबाबत ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत. Villagers of Aabloli fast to death
यामध्ये प्रामुख्याने निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, उपसरपंच श्री.अक्षय पागडे, ग्रामपंचायत सदस्य सौ.शैला पालशेतकर, सौ.पायल गोणबरे, सौ.रुपाली कदम, श्रीमती. नम्रता निमूणकर, ऋषिकेश बाईत, संजय कदम, ग्रामस्थ श्री.यशवंत पागडे, विद्याधर उर्फ अप्पा कदम, सचिन कारेकर, सचिन बाईत, महेंद्र कदम, प्रमेय आर्यमाने, सुभाष काजरोळकर, अनिकेत पागडे, अतिष भंडारी, संदेश काजरोळकर, तुकाराम पागडे, विजय पागडे, दिनेश भोसले, सौ.पुजा कारेकर, दिनेश शिंदे, प्रकाश कारेकर, विराज कारेकर, सुनिल महाडिक, रमेश नेटके, मोहन पागडे, राजेंद्र कारेकर, रोहन महाडिक, अमित करंजकर, सुमित पवार, सुजय पवार असे एकुण ३३ ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत. Villagers of Aabloli fast to death