संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 15 : मतदार संघाचे कार्यसम्राट लाडके आमदार भास्करशेठ जाधव यांचा गाव भेट दौरा कार्यक्रम गुहागर तालुक्यातील खोडदे येथील जेष्ठ शिवसैनिक श्री. राजेंद्र पंढरीनाथ साळवी यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला. यावेळी विकास कामावर चर्चा करण्यात आली तसेच नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुकीत गुहागर मतदार संघातून मिळालेले उबाठा शिवसेनेला व उमेदवार श्री.अनंत गीते यांना पक्षाचे चिन्ह नविन असतानाही मिळालेले मताधिक्य त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी या सभेचे जाधव यांच्या सूचनेनुसार नियोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भास्करशेठ जाधव यांनी मतदारांचे आभार मानून उपस्थितांना यापुढेही आपण विकास कामे करणारच असे आश्वासन दिले. Village visit tour of MLA Jadhav
यावेळी खोडदे गावाच्या वतीने आमदार श्री.भास्करशेठ जाधव यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुका सचिव श्री.विलास गुरव, उपतालुकाप्रमुख श्री. काशिनाथ मोहिते, श्री.शरद साळवी, श्री.राजेंद्र पंढरीनाथ साळवी, श्री.हरिचंद्र साळवी, श्री. किशन गोणबरे, श्री.बाळकृष्ण गोणबरे, श्री. कृष्णा डिंगणकर, शाखाप्रमुख नाना साळवी, सरपंच कुमारी पूजा गुरव, सदस्य रवींद्र निवाते, सौ. तनुजा पवार, श्री. संदेश साळवी, श्री. महेश मोरे, बौद्धवाडी अध्यक्ष श्री.राजेश पवार, श्री शानंद पवार, श्री. सुमित पवार, श्री. राकेश साळवी, सौ.रश्मी साळवी, सौ. कविता गुरव, श्रीमती. सुनीता वैद्य, श्री. प्राची साळवी, श्री. दशरथ साळवी, श्री. धंदीप साळवी, श्री. नितीन मोहिते, श्री. वैभव निवाते, संघटनेचे पदाधिकारी क्षेत्र प्रमुख श्री.महेश नाटेकर, तालुकाप्रमुख श्री.सचिन बाईत, विभाग प्रमुख श्री. रविंद्र आंबेकर, माजी सभापती सौ. पूर्वी निमुणकर, महिला संघटक श्रीमती. वनिता डिंगणकर, श्री. ऋषिकेश बाईत, पत्रकार श्री.संदेश कदम, सौ.पूजा कारेकर, श्री. गणेश हुमणे यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव श्री. विलास गुरव यांनी केले. Village visit tour of MLA Jadhav