मनसेचे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष
गुहागर, ता. 25 : गुहागर विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गुहागर विधानसभा क्षेत्रामधील नवरात्र उत्सव मंडळ व गाव भेट दौरा केला. यावेळी प्रत्येक गावातून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. Village visit of Pramod Gandhi

यामध्ये तवसाळ बाबरवाडी मध्ये ग्रामस्थांच्या वतीने शाळा दुरूस्ती बाबत चर्चा करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच ताबडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शुभेच्छा देऊन वेळणेश्वर गटाचे उप तालुका अध्यक्ष संदेश ठाकुर यांचे निवासस्थानी विजया दशमी (दसरा )निमित्त गणरायाचे दर्शन घेऊन वेळणेश्वर दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा देवीचा फोटो देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर नवतरुण मित्र मंडळ घोणसरे, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ रामपुर, श्री शारदादेवी मित्र मंडळ पालशेत, श्री आगडी देवी नवरात्रोत्सव मंडळ पालशेत, श्री नीलकंठेश्वर नवरात्र मंडळ शृंगारतळी ग्रामस्थ यांचे हस्ते प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. Village visit of Pramod Gandhi

यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, संह संपर्क अध्यक्ष समिर जोयशी, माजी संपर्क अध्यक्ष गुहागर गणेश कदम, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, तालुका सचिव श्रीराम विचारे, उपतालुकाध्यक्ष मंदार रहाटे, विभागअध्यक्ष उमेश पांचाळ, शाखाध्यक्ष सचिन निकम, प्रसिद्धी माध्यम गुहागर प्रितम सुर्वे, प्रसार माध्यम दिपक जोशी, महाराष्ट्र सैनिक सोहम गांधी, विराज गांधी,,रविंद्र पोतदार, महेश घाणेकर, विनायक पोतदार, अजय नार्वेकर, दिपक सुर्वे, मोज्जम दर्वेश, पुष्पराज सुर्वे आदि उपस्थित होते. Village visit of Pramod Gandhi
