संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक यांची संघटना निर्मिती करिता सभा भवानी सभागृह शृंगारतळी येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष, राजेश घाणेकर (पालपेणे), उपाध्यक्ष, प्रशांत कदम (उमराठ), सचिव, कविता पवार(आबलोली), सल्लागार, नितीन जाधव (गिमवी) व सदस्य, सर्वेश निमकर (चिंद्रावले), उमेश गोरे (आवरे-असोरे), संजय सावंत (जामसूत), ईश्वरी चव्हाण (पाटपन्हाळे), दिलीप शिगवण (खामशेत) अशी नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली. Village Employment Sevak Sabha at Sringaratali
यावेळी सभेस राम मोरे (पिंपर), प्रशांत कदम (उमराठ), संजय सावंत (जामसुत), राजेश आरेकर(कोतळूक), दिलीप शिगवण (खामशेत), ईश्वरी चव्हाण (पाटपन्हाळे), सायली म्हसकर (सा.त्रिशूळ), कविता पवार (आबलोली), लतिका सोलकर (मळण), राकेश मोहिते(पेवे), सर्वेश निमकर (चिंद्रावले), उमेश गोरे (आवरे-असोरे), सुभाष सोलकर (चिंद्रावले), रुपेश वीर (पोमेंडी), संजय भगवे (जानवले), राजेश घाणेकर (पालपेणे), रोहित सुर्वे (सडे जांभारी), नितीन मोहिते (खोडदे), नितीन जाधव (गिमवी) असे १९ ग्रामपंचायत चे ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते व त्यांनी संघटना असावी त्याकरिता प्रत्येकांनी आपआपले मत मांडले. Village Employment Sevak Sabha at Sringaratali


शासन नव-नवीन कामे तसेच जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांचेवर टाकत आहे त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. खास करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस १५ सिंचन विहिरी चे निकष देण्यात आले आहेत. तसेच नवीन पुढे कामाचे मस्टर हे स्वतः ग्राम रोजगार सेवक यांनी ग्रामपंचायत मध्ये काढावे असा आदेश येणार असल्याने त्याबद्दल वेगळे मानधन मिळणे अपेक्षित आहे. असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच ग्राम रोजगार सेवक ह्यांचे मानधन ग्रामपंचायत वेळेत तसेच पूर्ण देत नाही त्यावर चर्चा करण्यात आली व रोजगार सेवक ह्यांचे मानधन त्यांच्या स्वत:च्या बँक खाती जमा व्हावे, तसेच मानधन व्यतिरिक्त मासिक फिक्स रक्कम मिळावी. अशा अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली व खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. या संपूर्ण सभेचे सुत्रसंचलन श्री.सर्वेश निमकर यांनी केले तर अध्यक्ष श्री.राजेश घाणेकर यांनी सर्वांचे आभार मानले. Village Employment Sevak Sabha at Sringaratali