रत्नागिरी, ता. 05 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत शिवसोहळा कार्यक्रमाचा साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शिवसोहळा कार्यक्रम आयोजित केला. यात कथाकथन, प्रश्नमंजुषा व व्हिडिओ मेकिंग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. Various competitions in Dev, Ghaisas, Keer colleges
कथाकथन स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. वैभव कीर, प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी इतिहास विभागप्रमुख प्रा. मंदार बेटकर व व्हिडिओ मेकिंगसाठी उपप्रचार्या प्रा. वसुंधरा जाधव यांनी परीक्षण केले. या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. Various competitions in Dev, Ghaisas, Keer colleges


कथाकथन स्पर्धेत गौरवी ओळकर (प्रथम), दर्शन शिंदे व पलक वाघेला (द्वितीय) व सानिका खर्डे हिने (तृतीय) क्रमांक पटकविला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत समृद्धी बोरकर (प्रथम), गौरवी ओळकर व डॉली आलीम (द्वितीय) व नेहा गोसावी व सानिका खर्डे (तृतीय) क्रमांक मिळविला.
व्हिडिओ मेकिंगमध्ये रावसाहेब होसूर व संजोग भातडे (प्रथम), सोनिया शुक्ला (द्वितीय) व पारस गुळेकर (तृतीय) क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर उपस्थित होत्या. अनुष्का नागवेकर हिने आभार मानले. Various competitions in Dev, Ghaisas, Keer colleges