रत्नागिरी, ता. 16 : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबीराअंतर्गत कुर्धे येथे लिंगायत वाडी व खोताची वाडी येथे ४० फुटांचा वनराई बंधारा बांधला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस श्रमदान करून 500 पोतळ्यांचा वापर करून, 40 फुटांचा वनराई बंधारा पूर्ण केला. 63 स्वयंसेवक, 15 माजी स्वयंसेवक व 6 शिक्षकांनी मिळून हा बंधारा बांधलाय. 300 फूट दूरपर्यंत पाणीसाठा झाला आहे. यामुळे एप्रिल अखेरपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयात हे शिबिर नुकतेच झाले. शिबिरातील महत्वाचा उपक्रम म्हणजे श्रमदान. Vanrai dam built by students
पर्यावरण संस्थेचे डॉ. सावंत, प्रा. जी. एस. कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी स्वयंसेवकांसोबत श्रमदान केले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ६३ स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजीत भिडे, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. स्नेहा बाणे यांनी सहभाग घेतला. श्रमदानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी विद्यार्थी तार्किक खातू, सुहानी गुरव, साई सनगरे, निरंजन सागवेकर, दिव्येश भोंबल, ऋषिकेश रांबाडे, प्रतीक पवार, चित्रा पालकर, दीपराज ढवळे, साक्षी पंडित, साक्षी कुरतडकर, जय खाडे, आकाश मनचेकर, स्वरूप भाटकर, प्रणित चिले यांनी बंधारा पूर्ण करण्यासाठी सक्रिय मोलाची मदत केली. Vanrai dam built by students