रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेतर्फे वितरण
गुहागर, ता. 20 : येथील चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू यांना सामाजिक व सहकार क्षेत्रात करीत असलेल्या कामाबद्दल रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेने वैश्यरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कार रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी चिपळूण येथे होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाजाच्या महामेळाव्यात वितरण करण्यात येणार आहे. Vaishiratna Award to Ajay Khatu
अजय खातू सामाजिक व सहकार काम करत असताना समाजासाठी बहुमूल्य वेळ व आर्थिक योगदान देत आहेत. त्यामुळे आपल्या नावलौकीक वाढीबरोबरच वैश्य वाणी समाजाचे नाव देखील उंचावत आहेत. याची नोंद घेवून रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज सेवा संस्थेने वैश्यरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच ते किराणामालाचे व्यापारी असून गुहागरातील बाजारपेठ येथील हनुमान मित्र मंडळ देवस्थानचे ते अध्यक्षही आहेत. याचबरोबर अनेक सामाजिक व क्रीडा संस्थेमध्ये ते काम करत आहेत. Vaishiratna Award to Ajay Khatu