गुहागर, ता. 13 : महाराष्ट्र राज्याचे सा. बां. मंत्री, गुहागर विधानसभेचे पालक, नाम.सन्मा. रवींद्रजी चव्हाण, रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सन्मा. सतीशजी धारप यांच्या नेतृत्वात आणि गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ.विनयजी नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्री वाटप करण्यात येत आहे. Umbrella distribution by BJP


या छत्री वाटप मोहिमेअंतर्गत गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गट आबलोली परिसरात भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्रपती पदक विजेते प्रगतशील शेतकरी श्री सचिन कारेकर यांच्या गारवा पर्यटन केंद्राच्या हॉलमध्ये या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका अध्यक्ष श्री निलेश सुर्वे यांनी लोकसभेत या जिल्हा परिषद गटाने केलेल्या बहुमोल सहकार्याबाबत सर्वांचे आभार व्यक्त केले. हे आभार व्यक्त करत असतानाच चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आलेली ” मुख्यमंत्री लाडकी बहीण” या योजनेचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. ही योजना प्रभावीपणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राबविण्याची सर्वांना विनंती केली. याचबरोबर सन्मा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जनतेच्या शेवटच्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या आणि मंजूर केलेल्या सर्व योजनांची माहिती दिली. Umbrella distribution by BJP


या परिसरातील उपस्थित असणारे सर्वांना मोफत छत्रीचे वाटप केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष श्री संदीप साळवी, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती नम्रताताई निमुणकर, मासु गावचेचे माजी सरपंच पांडुरंग नाचरे, शांताराम नाचरे, मासुच्या विद्यमान उपसरपंच सौ. सिमरन नाचरे, मासूचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजयराव मसुरकर, विनायक सुर्वे, खोडदे माजी उपसरपंच अनंत मोरे, आबलोली माजी उपसरपंच बळीराम शिर्के, मनोज साळवी, सचिन कारेकर यांच्यासहित भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डॉ. विनयजी नातू यांच्या नेतृत्वात सलग दुसऱ्या वर्षी तालुक्यात करण्यात आलेल्या मोफत छत्री वाटपामुळे गुहागर तालुका भाजपमय होत असून भारतीय जनता पार्टी आणि समाजातील सर्व घटकांमधून समाधान व्यक्त होत आहे. Umbrella distribution by BJP