गुहागर तालुक्यात १२६७ जण होणार नवसाक्षर
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 23 मार्च रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेतून नव साक्षरांची साक्षरता तपासणी केली जाणार असून या परीक्षेत 1267 परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. Ulhas Navbharat Literacy Program
केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022- 23 ते सन 2026- 27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या शाळेतून उल्हास ॲपवर निरक्षर व्यक्तीची नोंदणी केलेली आहे. परीक्षेत असणाऱ्या निरीक्षकाने रविवार 23 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा घ्यावी. नोंदणीकृत निरक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन तहसीलदार परीक्षीत पाटील, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गटशिक्षण अधिकारी रायचंद गळवे यांनी केले आहे. Ulhas Navbharat Literacy Program


परीक्षार्थीनी नोंदणीसाठी स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी पैकी कोणती एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण 150 गुणांची आहे. याच उत्तीर्ण होण्यासाठी 51 गुण आवश्यक असते. परीक्षेचा कालावधी तीन तासाचा असेल. तर दिव्यांगासाठी 30 मिनिटे, तसेच ज्यादा वेळ देण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे यांनी आवाहन केले आहे. Ulhas Navbharat Literacy Program