• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उद्या शृंगारतळीत उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद मेळावा

by Ganesh Dhanawade
March 13, 2024
in Guhagar
173 2
1
Uddhav Thackeray's meeting
340
SHARES
972
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याने राजकीय ढोल सर्वत्र वाजू लागले आहेत. नुकतीच रामदास कदम यांची सभा होऊन गेली. रामदास कदम यांच्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उद्या श्रृंगारतळी १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सभा होणार आहे. Uddhav Thackeray’s meeting

गुहागरमध्ये सध्या चांगलेच राजकारण तापू लागले आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक नेत्यांनी गुहागरमध्ये सभा घेतल्या. प्रत्येक पक्षाचे नेते आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आरोप प्रत्यारोप सर्वत्र होत आहे. जास्तीत जास्त – कार्यकर्त्यांचा मॉब मेळाव्याला दाखवून आपला पक्ष किती मोठा आहे. आपल्या तालुक्यात आपली ताकद किती आहे हे वरिष्ठांना दाखवण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहेत. काही नेते नवीन मैदानाचा वापर करतात तर काही नेते जुन्याच मैदानावर खेळू इच्छितात. Uddhav Thackeray’s meeting

उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या मेळाव्यासाठी हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी लोटणार आहे. उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजता आरजीपीपीएल कंपनीमध्ये येणार असून १२ वाजता कार्यक्रम स्थळी शृंगारतळी येथे पोहोचणार आहेत. यावेळी मा. खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सचिन बाईत, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खेड चिपळूणचे तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख शहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत.  Uddhav Thackeray’s meeting

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUddhav Thackeray's meetingUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.