• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळू नयेत

by Guhagar News
April 22, 2023
in Guhagar
100 1
0
Turtle Festival in Guhagar

सामाजिक माध्यमांवर प्रसारीत झालेल्या याच फोटोने कासव महोत्सवाला गालबोट लागले

196
SHARES
559
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद

गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar

गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar

याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKokanLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTortoise eggsTurtleTurtle conservationTurtle Festival in GuhagarTurtle friendTurtle ScholarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.