Tag: Kokan

View of Konkan nature on the highway wall

मुंबई-गोवा महामार्गाच्या भिंतीवर कोकणच्या निसर्गाचे दर्शन

गुहागर, ता. 23 : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात बांधलेल्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. या भिंतीवर कोकणातील सौंदर्य रेखाटण्यात आले आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भिंती आता आकर्षित करू लागल्या ...

Turtle Festival in Guhagar

पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळू नयेत

वन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar

गणपतीपुळे येथे लवकरच सी-प्लेन सेवा

गणपतीपुळे येथे लवकरच सी-प्लेन सेवा

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी आणि परिसरातील भागामध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे शासन आणि स्थानिक लॉक सुद्धा या स्थळांच्या सुशोभीकरणावर जास्त प्रमाणात भर देत असतात. ...

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली गुहागर : तालुक्यातील काही गावात भातशेती नदी परिसर अथवा सखल भागात आहे. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावण्या पूर्ण केल्या असल्या, तरी सद्य:स्थितीत पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने ...

Aditi Tatkare at Bhumi Pottary

भुमि पॉटरीसारखे उद्योग कोकण समृध्द करतील – राज्यमंत्री आदिती तटकरे

गुहागर : मातीची भांडी बनविण्याचा वेगळा उद्योग गुहागरमध्ये आकाराला येतोय ही आनंदाची गोष्ट आहे. असे पर्यावरण पुरक आणि प्रदुषण विरहीत  प्रकल्प कोकणातील पर्यटन समृध्द करतील. शिवाय त्यातून उत्पन्न होणाऱ्या रोजगारामुळे ...

betrayed the paddy fields

परतीच्या पावसाने भातशेतीला दिला दगा

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश; सोमवारपासून महसुल आणि कृषी करणार पंचनामे, ग्रामसेवकांचाही सहभाग गुहागर : पावसाळा संपतानाच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. परतीच्या पावसाने या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे ...

Bhaskar Jadhav

कोकण महामंडळासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ. भास्कर जाधव यांना लेखी आश्वासन गुहागर : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे. यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पाठपुरावा करण्यात येईल. ...

Fish Market on Sea

सीआरझेडची ऑनलाईन जनसुनावणी रद्द न झाल्यास आंदोलन

महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती आक्रमक 05.09.2020गुहागर : सीआरझेडसंदर्भात आँनलाईन पध्दतीने जनसुनावणी घेण्याचा प्रयत्न काही जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. मात्र, आँनलाईन पध्दतीने घेण्यात येत असलेल्या जनसुनावणीची कायद्यात कुठेच तरतूद नसून आमचा या ...

Suvarndurga

मंडणगड ते गुहागर – सागरी पर्यटन

कोकणातील पर्यटन समुद्रावरील दंगामस्ती शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.  त्यातही रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे हे पर्यटकांचे खास आकर्षण असते.  त्याचसाठी पर्यटक मुरूड, हर्णै, कर्दे, आंजर्ले, केळशी, कोळथरे, गुहागर, ...