• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 May 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात तुकडोजी महाराज जयंती

by Manoj Bavdhankar
May 2, 2024
in Guhagar
142 1
0
पाटपन्हाळे महाविद्यालयात तुकडोजी महाराज जयंती
278
SHARES
795
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. Tukdoji Maharaj Jayanti

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक दृष्टीकोणातून थोडक्यात आढावा घेतला. उपस्थित प्राध्यापकवृंद व विद्यार्थी यांना राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. Tukdoji Maharaj Jayanti

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णाजी शिंधे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रमोद देसाई, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, प्रा. सौम्या चौघुले, डॉ. दिनेश पारखे, डॉ. प्रवीण सनये, प्रा. लंकेश गजभिये, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर श्री. परशुराम चव्हाण, श्री. नंदकुमार भेकरे, श्री. संदीप चव्हाण, श्री. रवींद्र चव्हाण, श्री. महेश झगडे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर व विद्यार्थांचे’ आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले. Tukdoji Maharaj Jayanti

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTukdoji Maharaj JayantiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share111SendTweet70
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.