• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कबड्डीपटु निखिलला श्रद्धांजली

by Mayuresh Patnakar
June 16, 2023
in Guhagar
262 3
0
Tribute_to_Kabaddipatu_Nikhil

Officials and players of Guhagar Taluka Kabaddi Association paying tribute to Nikhil Narvekar

515
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कबड्डी असोसिएशन; नार्वेकर कुटुंबाला आर्थिक मदत

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर तृप्तीनगर संघाचा अष्टपैलू कबड्डीपटू निखिल नार्वेकर याचे काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून निधन झाले. त्याला गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच निखिलच्या कुटुंबाला असोसिएशनच्या वतीने 25 हजार रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले. Tribute to Kabaddipatu Nikhil

गुहागर तालुक्यातील अडूर तृप्तीनगर संघाचा अष्टपैलू कबड्डीपटू निखिल नार्वेकर हा महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होता. 18 मे रोजी रात्री कर्दे येथे वीजेच्या खांबावर चढून दुरूस्ती करताना वीजेचा धक्का लागून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी भंडारी भवन, गुहागर येथे गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. Tribute to Kabaddipatu Nikhil

या सभेत अनेक खेळाडूंनी  निखिलच्या आठवणी जाग्या केल्या. निखिलने गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या तृप्तीनगर अडूर कबड्डी संघातून खेळताना जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपल्या नेत्रदिपक खेळ केला आहे. गुहागर तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उंचावले होते. कबड्डीसाठी आवश्यक असणारा व्यायाम दररोज न चुकता तो करत असे. तसेच संघातील इतर नवोदित खेळाडूंकडूनही तो नियमित व्यायाम करून घ्यायचा. एका हसतमुख, निस्वार्थी, जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत करणाऱ्या कबड्डीपटूला आपण मुकलो आहोत.  असे उमेदे व्यक्तिमत्त्व गेल्याने गुहागर तालुक्यातील कबड्डी खेळात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा भावना गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. तसेच निखिलच्या कुटुंबाला २५ हजार रूपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. Tribute to Kabaddipatu Nikhil

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTribute to Kabaddipatu NikhilUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share206SendTweet129
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.