Chiplun wins RGPPL tournament, Ratnagiri Runner UP
गुहागर, ता. 31 : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प आयोजित कबड्डीच्या महासंग्रामाचे अजिंक्यपदाचा मानकरी चिपळूणचा संघ ठरला. (Chiplun wins RGPPL tournament ) रत्नागिरी संघाला उपविजेते पद मिळाले. अंतिम सामन्यात यशस्वी चढाया करुन चिपळूणला विजयी करणारा ओंकार कुंभार स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. तर याच संघातील ऋषिकेश भोजनेची सर्वोत्कृष्ट पकड घेणारा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. तर रत्नागिरीचा रोहन गमरे सर्वोत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू ठरला. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दापोली संघाला व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक संगमेश्र्वर संघाला देण्यात आले.


Chiplun wins RGPPL tournament
Chiplun’s team became the Winner of the Kabaddi Mahasangram organized by Ratnagiri Gas and Power Project. Ratnagiri team got the runner-up position. Omkar Kumbhar, who successfully defeated Chiplun in the final match, became the Best Player, Hrishikesh Bhojane (Chiplun) Best Defender & Ratnagiri’s Rohan Gamare became the Best Rider of the tournament. The third prize in the competition was given to Dapoli team and the fourth prize was given to Sangameshwar team.


अंतिम सामना झाला एकतर्फी
आरजीपीपीएल कबड्डी महासंग्राम स्पर्धेतील अंतिम सामना चिपळूण आणि रत्नागिरी या तालुका संघांमध्ये झाला. सुरुवातीची काही मिनिटे दोन्ही संघांमध्ये चुरस होती. मात्र मध्यंतराचे वेळी चिपळूण घेतलेली आघाडी कायम ठेवली. अखेरच्या मिनिटात रत्नागिरी संघाने पुन्हा आक्रमकता दाखवली. मात्र चिपळूणच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत सामना आपल्या खिशात घातला. Chiplun wins RGPPL tournament
रत्नागिरी संघातील रोशन गमरे अंतिम सामन्याच्या सुरवातीला चिपळूण संघावर दबाव टाकण्यात यशस्वी झाला होता. दोन्ही संघांचे गुण समान गतीने वाढत होते. आक्रमक खेळ करणाऱ्या रत्नागिरीच्या दोन खेळाडूंनी चढाई करणाऱ्या चिपळूणच्या ओंकार कुंभारला पकडून (Super Tackle) चिपळूणवर दबाव वाढवला होता. पहिल्या सत्राच्या शेवटी चिपळूण संघाने आक्रमक होत रोशन गमरेला दोन वेळा बाद केले. त्यामुळे रत्नागिरीचा संघ दबावाखाली आला. मध्यंतराचे वेळी चिपळूणचा संघाने 18 गुण मिळवत 6 गुणांची आघाडी (रत्नागिरी 12) घेतली.
संबंधित बातमी वाचा : आर्थिक संकटात स्पर्धेच्या आयोजनाबाबत काय म्हणाले जॉन फिलीप
मध्यंतरानंतर चिपळूणच्या ओंकार कुंभारने एक बाजुने चढाया करत चिपळूणचे गुण वाढवले. रत्नागिरीचा संघ पूर्ण बाद करुन 2 जादा गुण मिळविले. एका चढाईमध्ये तीन खेळाडूंना बाद करत ओंकारने सुपर राईडचे 2 गुण मिळविले. रत्नागिरीचा संघ अंतिम सामन्यात मागे पडत असतानाच विनोदकुमार चढाईचे वेळी जायबंदी झाला. स्पर्धेची शेवटची तीन मिनिटे बाकी असताना पुन्हा एकदा रत्नागिरीच्या रोहन गमरेने आक्रमक चढाया करत चिपळूणचे ५ खेळाडू बाद केले. एक वेळ अशी आली की मैदानात चिपळूणचा केवळ एक खेळाडू शिल्लक होता. मात्र सर्वोत्कृष्ट खेळ करत या खेळाडूने एकेका खेळाडूला पुन्हा मैदानात घेतले. अखेर 39 गुण मिळवत चिपळूण संघाने जिल्हा अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. Chiplun wins RGPPL tournament


स्पर्धेचे बक्षिस वितरण (Prize distribution Ceremony)
या स्पर्धेतील विजेत्या चिपळूण संघाला 25 हजार रुपये रोख आणि चषक ( Chiplun wins RGPPL tournament ) तर उपविजेत्या रत्नागिरी संघाला 15 हजार रुपये रोख आणि चषक देवून आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असीमकुमार सामंता यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आरजीपीपीएलचे जॉन फिलीप (DGM, HR), गौरवकुमार श्रीवास्तव (Manger M&M), श्री. बाजवा, अमित शर्मा, शबरी गिरीश, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

