गुहागर, ता. 20 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात “देवमाणसाचे” स्थान असलेले गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३० वा स्मृतीदिन बुधवार दि. २४ जुलै २०२४ रोजी ” सकाळी ११ वा.गुहागर बाजार येथील लोकनेते माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल सभागृहात आदरांजली सभा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर(मुंबई व ग्रामीण)च्या वतीने आयोजित केली आहे. Tribute meeting of Rambhau Bendal


तरी आपल्या या लोकनेत्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी व सर्वसामान्य समाज घटकाला अभिप्रेत असलेला सामाजिक संकल्प करून, तो सिध्दीस नेण्याचा निर्धार करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी नम्र विनंती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. Tribute meeting of Rambhau Bendal