गुहागर, ता. 16 : आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत झटलेले, जनसामान्यांच्या हृदयात “देवमाणसाचे” स्थान असलेले गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३०वा स्मृतीदिन बुधवार दि. २४ जुलै २०२४ रोजी “संत तुकाराम छात्रालय, गुहागर येथे सकाळी ठिक ९:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. Tribute meeting of Rambhau Bendal
तसेच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर(मुंबई व ग्रामीण)च्या वतीने सकाळी ११ वा.गुहागर बाजार येथील लोकनेते माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल सभागृहात आदरांजली सभा आयोजित केली आहे. आपल्या या लोकनेत्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी नम्र विनंती अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. Tribute meeting of Rambhau Bendal