• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 July 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुसुमताई गांगुर्डे यांची आदरांजली सभा संपन्न

by Guhagar News
December 4, 2024
in Maharashtra
64 1
0
Tribute meeting of Kusumtai Gangurde
126
SHARES
360
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान; रामदासजी आठवले

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 04 : विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जेष्ठ नेत्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे आंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले यांनी व्यक्त केले. Tribute meeting of Kusumtai Gangurde

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशच्या माजी अध्यक्षा आणि बोरिवली बौद्ध रहिवाशी संस्कार केंद्र या संस्थेच्या ट्रस्टी तसेच दलित मित्र पुरस्कार प्राप्त आंबेडकरी चळवळीतील धडाडीच्या जेष्ठ नेत्या आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशिक्षण व्याख्यान मालेच्या प्रणेत्या, लेखिका, कवयित्री, समाजसेविका व मुंबई महानगरपालिकेत एडमिनिष्ट्रटिव्ह अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे गुरुवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ रोजी दु:खद निधन झाले.  त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या वतीने हॉटेल बे-ह्यू  गोराई बोरीवली पश्चिम मुंबई येथे आदरांजली सभा मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा वेंकट रामलू यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचे उपस्थीतीत नुकतीच संपन्न झाली. Tribute meeting of Kusumtai Gangurde

Tribute meeting of Kusumtai Gangurde

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, नाम.रामदासजी आठवले यांनी आदरांजली वाहताना आमच्या जेष्ठ नेत्या कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांचे निधनाने आंबेडकरी चळवळीची आणि साहित्य क्षेत्राची फार मोठी हाणी झाली आहे. हि हाणी न भरुन निघणारी आहे. अशा शब्दात भावुक होऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम. रामदासजी आठवले यांनी आदरांजली अर्पण केली. Tribute meeting of Kusumtai Gangurde

Tribute meeting of Kusumtai Gangurde

यावेळी आदरांजली सभेला नाम. रामदासजी आठवले यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सौ. सिमाताई रामदासजी आठवले, कवियत्री हिराताई बनसोडे, उर्मिलाताई पवार, हिराताई पवार, आशाताई कांबळे, नंदाताई, कांबळे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस ऍड.आशाताई लांडगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, महाराष्ट्र प्रदेश सचिव हरिहर यादव, महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन मोहिते, मुंबई प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सो.ना.कांबळे, सिद्धार्थ पवार, परशुराम माळी, महिला आघाडीच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षा निशा मोदी, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्षा रेश्मा खान, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप वाव्हळे, मालाड तालुका अध्यक्ष सुनिल गमरे, कांदिवली तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोंडे, महिला आघाडी गोरेगाव च्या अध्यक्ष छायाताई राऊत, वार्ड अध्यक्ष विजय सागरे आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.अभयाताई सोनावणे यांनी केले यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कालकथीत कुसुमताई हिरामण गांगुर्डे यांना आदरांजली अर्पण केली. Tribute meeting of Kusumtai Gangurde

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTribute meeting of Kusumtai GangurdeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.