पहिला मान कल्पेश बागकर यांना मिळाला
गुहागर, ता. 28 : गुहागर नगरपंचायत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड करण्याचा पहिला मान गुहागर गुरववाडी येथील कल्पेश रविंद्र बागकर यांना मिळाला.आपल्या वाढदिवसानिमित्ताने कल्पेश बागकार यांनी भारत संचार निगम कार्यालय आवारात जांभ वृक्ष लागवड केली असून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. Tree planting


ही लागवड करताना नगरपंचायतचे सुनील नवजेकर, भारत संचार निगमचे विजेंद्र गुलेरिया, महावितरणचे सचिन गावणंग, चंद्रभागा गॅस च्या संचालिका संगीता भाटकर, होमगार्ड महेश घाडगे, अविनाश सांडीम, अभिषेक कदम, मनोज सांडीम, सुभाष दणदणे, विनोद कदम, ओंकार कदम, श्रमिक भाटकर, पुरुषोत्तम गुरव, विरेंद्र साळवी व मित्र परिवार उपस्थित होता. यावेळी कल्पेश बागकर यांनी गुरववाडी येथील प्रत्येक युवकाच्या वाढदिवसाला झाडे लावावे, असे आव्हान सर्व युवकांना केले. Tree planting


कल्पेश बागकर हे ग्रामदेवतेचा उत्सव असो किंवा भावका देवीचा उत्सव असो तसेच वाडीतील सर्व लोकांच्या सुख दुःखासाठी धावून जाणारे आहेत. त्यांची ओळख भावी नगरसेवक म्हणूनच सध्या वाडीत आहे. कल्पेश बागकर हे उबाठ गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून योगायोगाने नगरपंचायतच्या वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड पहिला मान मिळाल्यामुळे लवकरच नगरसेवकाचे स्वप्नही साकार होणार, यामुळे तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी गुरव वाडी मित्र मंडळ, शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कल्पेश बागकर मित्र मंडळ यांच्यातर्फे वाढदिवसानिमित्त निरनिराळे कार्यक्रम घेण्यात आले. Tree planting