गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ हनुमान मंदिर येथे हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कृषीदिनाचे औचित्य साधून शरदचंद्रजी पवार महाविद्यालय खरवते – दहिवली येथील कृषीदूतांनी वृक्षारोपण व मंदिर सुशोभिकरणाचे आयोजन केले होते. Tree plantation at Nigundal


यावेळी कृषी सहाय्यक अमित शेळके म्हणाले की, आपल्या जीवनात वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध योजनांचे विश्लेषण व आधुनिक शेतीचे महत्त्व सांगितले. तसेच डॉ. ओमकार निर्मळ म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतू सध्या शेती व शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. तसेच विविध फळबागांबद्दल मार्गदर्शन, जैविक शेतीचे महत्त्व, रासायनिक खतांचा ऱ्हास थांबवला पाहिजे असे सांगितले. Tree plantation at Nigundal
यावेळी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, कृषिदूत स्वप्निल गायकवाड, प्रज्वल जाधव, प्रमोद पागीरे, यश आहेर, करण गोरे, राय चित्ते यांच्या सह सह्याद्री कृषी परिवाराचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. Tree plantation at Nigundal