सारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत आयोजन
गुहागर, ता. 14 : तालुक्यामध्ये सारथी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत पाटपन्हाळे महाविद्यालयांमध्ये काथ्यापासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. या प्रशिक्षणात उद्योग करू इच्छिणाऱ्या 30 काथ्या उद्योजकांनी सहभाग घेतला होता. Training at Patpanhale College
यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरीचे प्रकल्प संचालक माननीय श्री रामचंद्र गावडे, कार्यक्रम समन्वयक श्री संजय भागवत व निलेश गोयथळे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद देसाई यांनी भूषविले. हे प्रशिक्षण महाराणी सईबाई सारखी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास योजना या योजनेअंतर्गत कुणबी मराठा, मराठा कुणबी या समाजातील युवती आणि महिलांकरिता कॉयर आरटीकलवर आधारित मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सकाळी 11 ते 5 या वेळेत होणार असून यासाठी विविध विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर कॉयर इंडस्ट्री साठी विशेष भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. Training at Patpanhale College


प्रकल्प संचालक गावडे साहेब यांनी समाजामधील विशेष मराठा आणि कुणबी समाजाच्या युवक युवती ने या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले उद्योजक निर्माण करावेत यासाठी गुहागर तालुक्यामध्ये आवश्यक असणारा कच्चामाल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. याचा उपयोग करून उद्योग निर्माण करावेत, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद देसाई यांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी असलेल्या सर्व उद्योजकांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रवीण सनये यांनी केले. या प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे IQAC कॉर्डिनेटर प्राध्यापक लंकेश गजभिये. महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार प्राध्यापक श्री सुभाष घडशी यांनी मानले. Training at Patpanhale College