गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
गुहागर, ता. 10 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. Traffic in Shringartali is smooth during Ganeshotsav
चाकरमानी यावर्षी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने आलेले आहेत. बहुसंख्य चाकरमनी गावी येताना आपली वाहने घेऊन आले आहेत. शृंगारतळी ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने सर्व ग्राहक खरेदीसाठी येत असतात. लाखो रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते. गणपती काळात देखील हजारो ग्राहक वाहने घेऊन याठिकाणी खरेदीसाठी येत आहेत. बाजारपेठ मधील रस्त्यावर वाहने लावण्यास जागाच शिल्लक नसल्याचे दिसत आहे. जागेची अडचण असताना देखील येथील वाहतूक पोलिसांनी नम्रपणे नागरिकांशी संवाद साधत सहकार्य करण्याची विनंती करत आहेत. स्थानिक व मुंबईकर नागरिक पोलिसांच्या विनंतीला मान देत आहेत. Traffic in Shringartali is smooth during Ganeshotsav
सायंकाळी बाजारपेठेत मोठी गर्दी होत असते. त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या वाहनांची सुद्धा गर्दी होत असते. परंतु येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे सर्व वाहने सुरळीतपणे मार्गस्थ होत आहेत. बाजारपेठेतील शृंगारतळीचा राजा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. आज मितीस कोणताही अनुचित प्रकार बाजारपेठेत घडलेला नाही. गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. भोपळे, हवालदार श्री. भंडारी, हवालदार श्री. शिंदे, कॉन्स्टेबल वैभव चौगले, होमगार्ड श्री. चव्हाण, श्री. ठाकूर, श्री. विखारे, श्री. कदम आदी कर्मचारी दिवस रात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. Traffic in Shringartali is smooth during Ganeshotsav