• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ येथे बिबट्या बछड्याचे आगमन

by Guhagar News
August 11, 2024
in Guhagar
370 4
0
Tiger cub at Umrath

उमराठ येथील बिबट्या बछडे

726
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : नुकत्याच सुरू झालेल्या श्रावण महिन्यांच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवार दि. ३.८.२०२४ रोजी मुसळधार पाऊस होता. त्या दिवशी संध्याकाळी साधारणतः ७.३० वा. उमराठ बौद्धवाडीतील प्रशांत कदम यांच्या घराशेजारीच असलेल्या जंगलमय आडीतून एक साधारणतः १५ दिवसांच्या आतील छोटेसे बिबट्या वाघाचे पिल्लू ओरडत असताना प्रशांत कदम यांना दिसले. ते पाऊसामुळे गारठले होते व घराशेजारीच असलेल्या जुन्या कौलांच्या ढिगाऱ्याखाली लपले होते. Tiger cub at Umrath

लहान पिल्लू बहुधा बिबट्या वाघीण, तिच्या पिल्लांना दुसऱ्या जागी शिफ्ट करताना मुसळधार पावसामुळे चुकले गेले असावे आणि आईसाठी ओरडत घाबरून आश्रयाला आले असावे असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्या दिवशी रात्री भरपूर पाऊस आणि काळोख असल्यामुळे प्रशांत कदम, त्यांचे भाऊबंद आणि वाडीतील मंडळींनी त्या पिल्लाला अधिक त्रास न देता रात्री त्याची आई वाघीण शोधत येऊन त्याला घेऊन जाईल या हेतुने तिथेच राहू दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा पाहिले तर ते पिल्लू तिथेच होते. ते घाबरलेले होतेच परंतू पावसात भिजल्यामुळे गारठलेले होते. रविवारी सकाळी मात्र त्याला प्रशांत कदम आणि भाऊबंदांनी उचलून घरी आणले. कपड्याने स्वच्छ पुसून लहान मुलांच्या दुध बॉटलने दुध पाजले. त्या पिल्लाला थोडी तरतरी आली आणि सर्वत्र फरू लागले. त्याला छोट्या बास्केटमध्ये उबदार कपड्यात ठेवून देखभाल चालू केली. Tiger cub at Umrath

त्यानंतर रविवारी दि. ४.८.२०२४ रोजी सकाळीच गुहागर वनविभाग अधिकारी यांना प्रशांत कदम आणि उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानुसार सोमवार दि. ५.८.२०२४ रोजी वनविभाग अधिकारी येऊन त्या पिल्लाला घेऊन गेले. परंतु ते पिल्लू फारच छोटे असल्यामुळे त्याची देखभाल करण्यासाठी अडचणी येत होत्या. वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन त्या बछड्याला आई वाघीण पुन्हा घेऊन जाईल अशा हिशेबाने मंगळवारी संध्याकाळी पुन्हा वनविभाग अधिकाऱ्यांची टिम त्या बछड्याला घेऊन घटनास्थळी आले. संध्याकाळी अंधार होण्यापूर्वी त्या बछड्याला ते जिथून आले त्या रहदारीच्या वाटेवर छोट्या उघडता येईल अशा बंद बास्केट पिंजऱ्यात त्या बछड्याला ठेऊन कृती काय होते ते पाहण्यासाठी तेथे झाडांच्या सहाय्याने तीन कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर नेमके काय घडते हे पाहण्यासाठी दोन वनअधिकारी रात्रभर प्रशांत कदम यांच्या घरी राहून पालथ ठेवत होते. अशी कृती मंगळवार आणि बुधवार या दोन्हीं दिवसी केल्यानंतर सुद्धा वाघीण येऊन घेऊन जात नाही, हे पाहिल्यावर वनअधिकाऱ्यांच्या टिमने गुरूवार दि. ८.८.२०२४ रोजी त्या बछड्याची पुढील देखभाल करण्यासाठी मुंबई बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) येथे रवानगी करण्यात आली.  Tiger cub at Umrath

एका निष्पाप बिबट्याच्या बछड्याला जिवदान दिल्याबद्दल उमराठ बौद्धवाडीतील प्रशांत कदम परिवाराचे, भाऊबंदांचे तसेच या मोहिमेत उत्तम सहकार्य दिल्याबद्दल सहभागी वनविभागाच्या सर्व वनअधिकारी टिमचे ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. Tiger cub at Umrath

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTigerTiger cubTiger cub at UmrathUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याबिबट्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share290SendTweet182
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.