• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवडणूक केंद्रावरील व्यवस्था पाहणाऱ्यांना अद्याप भत्ता नाही

by Ganesh Dhanawade
June 2, 2024
in Politics
101 1
1
197
SHARES
564
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 02 : लोकसभा निवडणुका होऊन जवळपास पाऊण महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील गावागावात मतदान केंद्रावर ड्यूटीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अल्पोपहार तसेच भोजन व्यवस्था करणाऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नसल्याचे समोर आले आहे. There is still no allowance for election system watchers

मुख्य म्हणजे जवळपास सर्वच निवडणूक कालावधीत असा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे. मतदान झाले की ज्यावेळी मतदान केंद्रावर अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग आपली ड्यूटी बजावत असतात ते आपली ड्यूटी पूर्ण करून जातात. मात्र, या कालावधीत त्यांची चहा, नाष्टा तसेच भोजन व्यवस्था अतिशय विश्वासावर स्थानिक करत असतात. त्यांना त्याचा मोबदला जात नसल्याचे समोर आले आहे. आम्हाला भत्ता मिळत नाही अशी सबब सांगून आजपर्यंत अनेकांना आपल्या मेहनतीच्या पैशावर पाणी सोडावे लागले आहे. ग्रामीण भागात अशी व्यवस्था पाहणाऱ्या काहींनी ही व्यथा मांडली आहे. एकीकडे मोठा गाजावाजा करत तसेच पैशाची उधळण करत निवडणूका होत असतात. मात्र दुसरीकडे निवडणूकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी गावागावातील मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची भोजन व्यवस्था पाहणाऱ्या ग्रामीण भागातील गरजू कुटुंबाला मात्र अशा प्रकारे आपला मोबदला मिळत नाही. ही शासनानासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. There is still no allowance for election system watchers

निवडणुकीच्या रणधुमाळीत गावागावात एक कुटुंब फार महत्वाची जबाबदारी पार पाडत असतं ते म्हणजे निवडणूक केंद्रांवर आलेल्या कर्मचाऱ्यांची जेवणाची, चहा, पाण्याची व्यवस्था करणे. त्यांची कोणती गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे. परंतु गेली काही वर्षे या कर्मचाऱ्यांमध्ये येणारे काही कर्मचारी ( होमगार्ड, पोलीस ) आम्हाला भत्ता मिळत नाही या सबबीवर फुकट व्यवस्थेची मागणी करत आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः दोनदा घेतलेला आहे. यावर्षी सुद्धा तोच प्रकार घडला आहे. आजूबाजूच्या काही गावांमध्ये चौकशी केली असता सगळीकडे असाच प्रकार उघडकीस येतो आहे. ग्रामीण भागात या गोष्टी सगळ्या विश्वासावर चालत असतात. मतदानाचा कालावधी संपल्यानंतर ज्यावेळी बिल देण्याची वेळ येते तेव्हा हे कर्मचारी हात वर करतात. यापुढे गावागावात पैसे अगोदर जमा केल्याशिवाय जेवण मिळणार नाही असा ठरावंच करण्याची गरज वाटत आहे. – सत्यवान देरदेकर, परचुरी, गुहागर There is still no allowance for election system watchers

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThere is still no allowance for election system watchersUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet49
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.