26,42,339/- चोरीनंतर दुकान उघडले
गुहागर, ता. 13 : अक्षय तृतीयेच्या शिवमुहूर्तावर लोकांनी खरेदी केलेल्या मोबाईलच्या गल्ला दुकानात असतानाच गोविंदा मोबाईल शॉपी वर दरोडा पडला जवळपास 90 हजाराची रोकड आणि 25,52,339 लाखाचे मोबाईल दरोडेखोर घेऊन पळाले. रविवारचा दिवस पोलीस पंचनामा श्वान पथकाची तपासणी ठसे तज्ञांची तपासणी अशा गडबडीत गेले. तरीही या दुकानातील कर्मचारी आणि मालक यांनी सोमवारी सुट्टीचा वार असतानाही गोविंद मोबाईल शॉपी ग्राहकांसाठी खुली गेली आणि व्यवसायाचा पुनश्च हरी ओम केला. Theft at Sringaratali
शृंगारतळी बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या कडेला गोविंदा मोबाईल शाँपी आहे. या शाँपीचा मागील दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश करून मोबाईल शाँपीच्या काऊंटर बाजूच्या रॅकवर विक्रिकरीता सीलबंद बॉक्समध्ये ठेवलेले सॅमसंग, व्हीवो, ओपो, रीअल मी, रेडमी, वनप्लस, अपल, कंपनीचे मोबाईल तसेच काऊंटरच्या ड्रावरमध्ये ठेवलेली ९० हजारांची रोकड शनिवारी मध्यरात्री चोरटयांनी दरोडा टाकून लांबवली. श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्यात आला मात्र, अद्याप तपास लागलेला नसल्याचे चौकशीअंती समोर आले आहे. Theft at Sringaratali
यामध्ये सॅमसंग कंपनीचे 40 मोबाईल रु. 1274422/-किंमतीचे, व्हीवो कंपनीचे 33 मोबाईल रु. 758074/-किंमतीचे, ओपो कंपनीचा 1 मोबाईल रु. 8653/-किंमतीचे, वन प्लस कंपनीचे 3 मोबाईल रु. 87630/-किंमतीचे, रीअल मी कंपनीचे 6 मोबाईल रु. 102140/-किंमतीचे, रेडमी कंपनीचा 1 मोबाईल रु. 11900/-किंमतीचा, आय फोन कंपनीचे 5 मोबाईल रु. 309520/-किंमतीचे व 90000/- रोख रक्कम असा सुमारे 2642339/- लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला. दुदैवाने या दिवशी शाँपीमधील सीसीटीव्ही कँमेरेही बंद होते. या शाँपीमध्ये दरोडा पडण्याच्या एक दिवसापूर्वीच मोबाईल, टँब असा उच्च किमतीचा ऐवज भरण्यात आला होता. Theft at Sringaratali
गोविंदा मोबाईल शॉपी बाजूच्या मेडीकलमधील कँमेऱ्यामध्ये चोरट्यांचे फोटो दिसून आलेले असून तीनजण या दरोड्यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. या धाडसी दरोड्याने शृंगारतळीसह संपूर्ण गुहागर तालुका हादरला आहे. चोरीचा प्रकार रविवारी सकाळी उघड झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते दाखल झाले. त्यांनी आपल्या वरिष्ठांना ही माहिती दिली. यानंतर रत्नागिरी पोलिस उपअधिक्षक जयश्री गायकवाड, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, गुहागर पोलिस उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन शाँपीची पाहणी केली. रत्नागिरीतून श्वान पथक ठसे तज्ज्ञही दाखल झाले होते. श्वान हस्तक सुदेश सावंत यांनी माही या श्वानाद्वारे परिसर पिंजून काढला. मात्र, चोरट्यांचा मार्ग सापडला नाही. घटनास्थळी दोन कटावन्या व एक पोपट पाना आढळून आला. या शाँपीमध्ये २०११ मध्ये चोरी झाली होती व या चोरीचा उलगडा दोन वर्षांनी झाला होता. Theft at Sringaratali