• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आगाराचा अजब कारभार

by Ganesh Dhanawade
February 10, 2024
in Guhagar
257 2
1
The strange administration of Guhagar Agra
504
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तब्बल ४ तास एकाच जागी बस उभी; सचिन बाईत यांनी व्यक्त केली नाराजी

गुहागर, ता. 10 : आगार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. असाच एक प्रकार मुंबई – तवसाळ एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ओढवला. मुंबईतून गावी आल्यावर एस.टी.च्या डिक्कीमध्ये या प्रवाशांचे सामान तब्बल ४ तास काढता आलं नव्हतं. त्यामुळे गाडी एकाच जागी उभी राहिली होती. या अनागोंदी कारभाराची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू होती. The strange administration of Guhagar Agra

मुंबईतून तवसाळकडे जाण्यासाठी मुंबई तवसाळ गाडी नं. MH – 14 B T 2729 हि गाडी शुक्रवारी सकाळी आबलोली येथे आली. सकाळी ८ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत एस.टी.ची डिक्की उघडण्याचा केविलवाणा प्रयत्न चालक – वाहक आणि प्रवासी करीत होते. त्यावेळी मुंबईहून आलेले काही प्रवासी उतरले. त्यांच्या सोबत आणलेले त्यांचे सामान हे एसटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते ते काढण्यासाठी त्यांनी गाडीची डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिक्की काही उघडेना. अनेक प्रयत्न करूनही डीक्की न उघडल्याने गुहागर आगार प्रमुखांच्या कानावर हि गोष्ट घालण्यात आली. त्यावेळी गुहागर आगारातून अजब उत्तर ऐकायला मिळाले ते म्हणजे ती बस गुहागर मध्ये आणून डेपो मध्ये जमा करा. आपण या ठिकाणी गाडीची डिक्की खोलून देऊ.   The strange administration of Guhagar Agra

एस.टी.महामंडळ आणि गुहागर आगाराच्या या अजब आणि गजब कारभाराची चर्चा सध्या गुहागर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. या प्रकाराबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी नाराजी व्यक्त करुन प्रवाशांची आस्थेने चौकशी केली. एसटीच्या अधिका-यांना जागेवर येऊन बसची डिक्की उघडून देण्यास सांगितले. The strange administration of Guhagar Agra

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe strange administration of Guhagar AgraUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share202SendTweet126
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.