अडूर संघ विजेता तर फ्रेंन्ड सर्कल गुहागर संघ उपविजेता
गुहागर, ता. 09 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पुरस्कृत राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित कबड्डी स्पर्धेत तृप्तीनगर अडूर संघाने विजेतेपद पटकावले तर फ्रेंन्ड सर्कल गुहागर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत १४ संघांनी सहभाग घेतला होता. Kabaddi Tournament at Kotaluk


गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्रेंन्ड सर्कल गुहागर खालचापाट विरूद्ध श्रीराम दत्तसेवा आरे संघामध्ये चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीचा सामना बरोबरीत सुटला. पाच चढाईमध्ये फ्रेंन्ड सर्कल गुहागर संघाने विजय संपादन केला. तर तृप्तीनगर अडूर संघाने पिंपळादेवी गुहागर वरचापाट संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात तृप्तीनगर अडूर संघाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विजेतेपद पटकावले. Kabaddi Tournament at Kotaluk


स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रक्कम १० हजार व आकर्षक चषक, उपविजेत्या संघास रोख रक्कम ५ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तृप्तीनगर अडूर संघाचा प्रसन्न नार्वेकर याला सायकल देण्यात आली. तर पकड प्रविण काजारे, अंतिम सामना सामनावीर केतन हळये, चढाई फ्रेंन्ड सर्कल गुहागर संघाचा अनिकेत भोसले यांना स्पोर्ट्स बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. पंच म्हणून समीद घाणेकर, सुरज पवार, प्रशांत सकपाळ, समीर जांगळी, निलेश खेडेकर, प्रभु हंबर्डे, रूपेश कदम, संदेश म्हापदी तर समालोचन दिपक देवकर यांनी केले. स्पर्धा स्वामी इव्हेंटच्या माध्यमातून यू ट्यूब लाईव्ह करण्यात आली होती स्पर्धेसाठी ८ हजार ५०० व्हयुअर्स झाले. Kabaddi Tournament at Kotaluk


स्पर्धेच्या वेळी भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, सरचिटणीस दिनेश बागकर, रविंद्र अवेरे, आरेगाव माजी सरपंच श्रीकांत महाजन, भाजपा ओबीसी आघाडी गुहागर तालुकाध्यक्ष साईनाथ कळझुणकर, पंचायत समिती माजी सदस्य विजय भुवड, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल भेकरे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगम मोरे, महेश तोडणकर, विनायक सुर्वे, आनंदा पवार, उदमेवाडी माजी अध्यक्ष आबा आरेकर, अनंत चव्हाण, विद्यमान अध्यक्ष समीर ओक, राजा हिंदुस्थानी मंडळाचे अध्यक्ष उल्हास आरेकर, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हा सदस्य रविंद्र कानिटकर, गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन प्रमुख कार्यवाह, भाजपा तालुका सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, सल्लागार दिपक देवकर, स्पर्धा निरीक्षक पराग भोसले, समीर आरेकर, नरेश बागकर, गोविंद सकपाळ आदींसह पदाधिकारी व क्रिडाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. Kabaddi Tournament at Kotaluk