• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कारगील युद्धाची कथा उलगडली मुलाखतीतून

by Ganesh Dhanawade
February 6, 2024
in Ratnagiri
69 1
1
The story of Kargil war unfolded from the interview
135
SHARES
387
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लक्ष फाऊंडेशनच्या प्रमुख सौ.अनुराधा प्रभूदेसाई यांच्या वाणीतून झाले सादरीकरण

रत्नागिरी, ता. 06 : जम्मू आणि काश्मीरमधील व समुद्रसपाटीतून १९००० फूट उंच, उणे २० तापमान, प्रचंड थंडी, बर्फाच्छादित शिखरे अशा प्रतिकूल स्थिती कारगिलचे युद्ध भारताने वीर जवानांमुळे जिंकले. टायगर हिल, तोलोलिंग, काकसर, कारगिल, जुबर, खालुबर यासह रॉकी नॉक व अन्य चौक्यांवर पाकिस्तानने कब्जा केला होता. त्या वेळी सुमारे तीन महिने चाललेल्या घनघोर युद्धात भारताने पाकवर विजय संपादन केला. आपले अनेक जवान शहीद झाले. या कारगिल युद्धाची कथा कारगील युद्धातील ब्रिगेडिअर एस. व्ही. भास्कर आणि कॅप्टन डॉ. राजेश अढाऊ यांच्या तोंडून ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकर विद्यार्थ्यांना मिळाली. The story of Kargil war unfolded from the interview

लक्ष्य फाउंडेशनतर्फे शनिवारी आयोजित मेरा देश मेरी पहचान या कार्यक्रमात हे दोघेही कारगील योद्धे बोलत होते. फाउंडेशनच्या विश्वस्त अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रमोद महाजन क्रीडांगणावर चार हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, एनसीसी कॅडेट्स व रत्नागिरीकरांची कार्यक्रमाला गर्दी झाली होती. डॉ. अढाऊ हे मुळचे अमरावतीचे. त्यांनी या युद्धात जवळपास १०८ जखमी सैनिकांना जीवदान दिले. कॅप्टन विक्रम बात्रा व अन्य जवानांना वाचवू शकलो नसल्याचे दुःख त्यांना वाटते. रक्तबंबाळ जखमी सैनिकांना वाचवण्याकरिता ऑपरेशन, सलाईन लावणे, औषध गोळ्या देणे हे काम केल्याचे सांगताना ते भावुक झाले. The story of Kargil war unfolded from the interview

The story of Kargil war unfolded from the interview

आर्मीचे कठीण प्रशिक्षण, एलओसी कारगिल चित्रपटातील काही क्षणचित्रे या वेळी दाखवून त्या वेळचे प्रसंग ब्रिगेडिअर भास्कर यांनी सांगितले. रेडिओ सेटवरून बोलावे लागते. त्या वेळी संदेश देताना वापरण्यात कोडवर्ड कसे असतात याबाबत त्यांनी सांगितले. शत्रूला कोणत्याही गोष्टीची माहिती मिळू नये म्हणून हे करावे लागते. युद्धामध्ये सैनिकांचे मनोबल वाढवण्याचे काम करावे लागते. आपल्याला पुढे जात राहायचे आहे. आर्मीत आपण याकरिताच आलो होतो, आर्मीचे अपयश म्हणजे देशाचे अपयश. परंतु आम्ही यश मिळवल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. The story of Kargil war unfolded from the interview

युवकांना संदेश देताना डॉ. अढाऊ म्हणाले की, मी स्वतःसाठी काय केले यापेक्षा देशासाठी अर्पण काय केले याचा विचार करा. आपल्या पायाखाली येणारा प्लास्टिक कचरा गोळा करा. स्वतः कुठेही प्लास्टिक रॅपर्स, पिशव्या टाकून कचरा करू नका. समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे मासे, जलचरांना व पर्याये आपल्याला धोका पोहोचत आहे. तर ब्रिगेडिअर भास्कर यांनी सांगितले की, भारतीय सैनिकच देशसेवा करतात असे नाही तर सर्व भारतीय देशासाठी काम करत आहेत. जबाबदारीने काम पूर्ण करा, देशाचे कायदे, नियम पाळा, कोणीही लहान मोठा असू दे त्याचा आदर करायला शिका. तेव्हा सर्वांनाच आदर मिळेल. The story of Kargil war unfolded from the interview

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कौस्तुभ सावंत, संतोष पावरी , सुहास ठाकूरदेसाई, राजेश आयरे, नंदू चव्हाण, माजी सैनिक मोहन सातव, शंकर मिलके, विजय आंबेरकर,राकेश नलावडे यांच्यासमवेत सर्व माजी सैनिक,सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी केल्याबद्दल अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमात सतत भारतीय सैन्यासाठी टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. सुनियोजित कार्यक्रम आणि बैठक व्यवस्थेमुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला रत्नागिरीतील ३० माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता उपस्थित होत्या. The story of Kargil war unfolded from the interview

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe story of Kargil war unfolded from the interviewUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.