गुहागर, ता. 29 : तालुक्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडण्याचा प्रकार घडत आहे तर अडूर कोंड कारूळ येथे घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने घरातील सदस्यांना मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास अन्य ठिकाणी राहण्याची सूचना दिली आहे. The protective wall collapsed on the house
तालुक्यातील अडूर कोंड कारुळ येथील राजेश रमेश जाक्कर यांच्या घराची संरक्षक भिंत शेजारील दिनेश शांताराम असगोलकर यांच्या घरावर पडून घराच्या भिंतींना तडा व छताचे नुकसान झाले आहे. दिनेश असगोलकर यांचे 75,500 रुपयाचे नुकसान झाले आहे तर राजेश जाक्कर यांचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीचा पंचनामा करून महसूल विभागात याची नोंद करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यात गुरुवारी घेतलेल्या पावसाच्या नोंदीमध्ये 83 मिलिमीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत एकूण 629.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. The protective wall collapsed on the house