• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

समुद्रातील सूळ सुळका पुण्यातील गिर्यारोहकांनी केला सर

by Guhagar News
December 19, 2024
in Ratnagiri
205 2
0
The mountaineers crossed the ridge
403
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 19 : समुद्रातील उत्तुंग सूळ सुळका सर करणे  ही गिर्यारोहणातील अत्यंत अवघड कामगिरी समजली जाते. परंतु पुण्यातील एस. एल. एडवेंचरच्या मावळ्यांनी रत्नागिरीच्या भर समुद्रातील एकमेव सूळ हा उत्तुंग सुळका तितक्याच लीलया सर केला जितक्या सहजतेने गडकिल्ले आणि इतर सुळके सर करतात. या खडतर मोहिमेचे सर्वत्रच कौतुक होत आहे. The mountaineers crossed the ridge

एव्हरेस्टवीर लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एल. एडवेंचरच्या मावळ्यांनी कोकणातील रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उभा असलेला एकमेव सुळका सर करण्याचे मोठं आव्हान स्वीकारले. आणि समुद्र किनारपट्टीजवळील खडक, जोराने धडकणाऱ्या लाटा, दमट वातावरण, ठिसूळ खडक आणि घोंगावणारा वारा यामुळे ही मोहीम खरं तर जोखमीची होती आणि समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीमुळे तितकीच जिकिरीची देखील होती. The mountaineers crossed the ridge

मात्र, तरीही गिर्यारोहक अरविंद अनंत नवेले व अमरीश ठाकूर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेमध्ये एकूण तेरा गिर्यारोहकांनी सहभाग घेत यशस्वी चढाई केली. मोहिमेतील सदस्यांनी पुणे येथून रात्री १२:३० वाजता रत्नागिरीसाठी प्रवास चालू केला. सकाळी ९:०० वाजता सर्वजण सुळक्याच्या पायथ्याला पोहोचले. तुषार दिघे व योगेश काळे यांनी सुळका सर करण्यासाठी सुरुवात केली. काही वेळेतच या दोघांनी सुळक्याचा माथा गाठण्यास यश मिळवले. The mountaineers crossed the ridge

त्यानंतर शैलेश थोरवे, संकेत दिघे, केदार खरडे, हृतिक खैरे यांनी मागोमाग सुळका सर केला. दुपारी उन्हाचा तडाखा वाढत चालला होता व समुद्राला आलेल्या भरतीमुळे काही गिर्यारोकांना चढाई करण्यासाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर प्रसाद बागवे, तेजस नाईकवाडे, अमित वैद्य यांनी चढाई केली. या मोहिमेच्या सर्व जबाबदाऱ्या स्वप्नाली उघडे व श्रेया बोडके यांनी उत्तम प्रकारे सांभाळल्या. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे एस. एल. एडवेंचरला हा समुद्री सुळका सर करणे शक्य झाले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, मोहिमेत सहभागी झालेल्या ६ वर्षीय बाल गिर्यारोहक रोम लहू उघडे याने पहिल्याच प्रयत्नातच हा सुळका यशस्वीरीत्या सर केला. The mountaineers crossed the ridge

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThe mountaineers crossed the ridgeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share161SendTweet101
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.