• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विरासत ए बंजाराचे आज लोकार्पण

by Mayuresh Patnakar
October 5, 2024
in Bharat
56 1
0
The launch of Virasat A Banjara
111
SHARES
317
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी दिला होता 593 कोटींचा निधी

गुहागर, ता. 05 : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ‘विरासत ए बंजारा’ या नावाने उभारल्या गेलेल्या वस्तु संग्रहालयाचे लोकार्पण ५ ऑक्टोबरला भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झाले. हे संग्रहालय बंजारा समाजाच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे असून वास्तुकलेच्या दृष्टीने अत्यंत मनोहर असे बनले आहे.

The launch of Virasat A Banjara

बंजारा समाज महाराष्ट्रातील लढवय्या, मेहनती आणि आपली परंपरा, संस्कृती जपणारा समाज आहे. या समाजाच्या वेशभूषा, नृत्य, सण साजरे करण्याची पद्धती यातून हिंदुत्वाचे ठळक दर्शन होते. या समाजाकडून साजरे होणारे श्रीकृष्ण जन्माष्टमी व होळी हे सण विशेष असतात. पोहरादेवीच्या श्री जगदंबेवर आणि संत सेवालाल महाराजांवर या समाजाची खूप श्रद्धा आहे. चैत्र महिन्यात येथे होणाऱ्या यात्रेत महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिशा , छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा, राजस्थान या राज्यातून भाविक येतात. संत सेवालाल महाराजांनंतर संत डॉ. रामराव बापू यांनी समाजाला मार्गदर्शन केले. जगदंबा देवीचे मंदिर, संत सेवालाल महाराजांचे समाधी मंदिर, संत डॉ. रामराव बापूंचे स्मृती मंदिर ही पोहरादेवी येथील दर्शनीय स्थळे आहेत. The launch of Virasat A Banjara

The launch of Virasat A Banjara

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी विकास आराखडा बनवण्यास सुरुवात झाली. ५९३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात देवी मंदिराचा विकास, संत सेवालाल महाराज समाधी मंदिराचा विकास, संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भव्य आणि सुसज्ज असे भक्त निवास, नगाऱ्याच्या आकारात बांधलेले भव्य असे बंजारा समाजाची संस्कृती दाखवणारे वस्तुसंग्रहालय, परकोट या कामांचा समावेश आहे. इतर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. कॉँग्रेस सरकारच्या काळात कधीही न झालेला या तीर्थक्षेत्राचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून होत असल्याबद्दल बंजारा समाजात समाधानाची भावना आहे. The launch of Virasat A Banjara

नगाऱ्याच्या आकारात बांधलेले ‘विरासत ए बंजारा’ हे वस्तुसंग्रहालय भाविकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. बंजारा समाजाची संस्कृती दाखवणारी तांड्याची प्रतिकृती तेथे बांधली गेली आहे. बंजारा समाजातील महापुरूषांचे कार्य दाखवणारी अनेक भित्तिशिल्पे आणि भित्तिचित्रे चितारण्यात आली आहेत. बंजारा समाजाची संस्कृती दाखवणारा प्रकाश आणि ध्वनीचा खेळ तेथील विशेष आकर्षणाची बाब राहणार आहे. The launch of Virasat A Banjara

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThe launch of Virasat A BanjaraUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet28
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.