प्रधान सचिवांची तीन विषयाला अदयाप सहमती नाही
गुहागर, ता. 03 : रस्त्याची रुंदि कमी करणे, ठरावीक ठिकाणचे आरक्षण उठवीणे याबाबत हरकती घेऊन केलेल्या बदलाला प्रधान सचिवांनी अदयापही सहमती दिलेली नाही. यामुळे हे तिनही विषय राखून ठेवण्यात आले असून सुनावणीचा अहवाल आल्यानंतर पुन्हा यावर योग्य तो पर्याय सुचवीण्यात येईल. अशी माहीती मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी दिली. The issue of road width is undecided
गुहागर नगरपंचायतीच्या विकास आराखडयाबाबत १५०० च्या वरती हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये मुख्य म्हणजे गुहागर शहर वरचापाट मार्ग हा १९ मिटर रूंदिचा दाखविण्यात आला होता. तो ९ मिटरपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी वरचापाट ग्रामस्थांनी केली होती. या मागणीप्रमाणे सुधारीत विकास आराखडयामध्ये बदल करण्यात आला होता. दरम्यान शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आसिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम सुनावणी घेण्यात आली. The issue of road width is undecided


यावेळी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, नगररचनाकार विभागाचे निखिल पाटील तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. सुनावणीमध्ये बहुतांशी विषयाला सहमती देण्यात आली. संचालक मंडळाने सर्वच विषय मान्य केले. परंतु प्रधान सचिव यांनी वरचापाट परिसरातील पार्किंग व चार्जिंग पॉईंटसाठी आवश्यक शासकीय जागा सुचवावी असे सांगत तोपर्यंत हा विषय राखीव ठेवण्यात आला आहे. तर वरचापाट येथील रस्ता ९ मिटरवर करावा. अशी गुहागर नगरपंचायतीच्यावतीने केलेली विनंतीलाही प्रलंबीत ठेवण्यात आले आहे. The issue of road width is undecided
याचबरोबर क्रिडा संकुल या वरच्याही बदललेल्या आरक्षणाबाबत निर्णय अनिर्णित ठेवला आहे. सध्या शहरातून दाखविलेल्या कोष्टल हायवेचे रेखांकनही तसेच ठेवण्यात आले आहे. यामुळे हे सर्व विषय प्रधान सचिवांकडे प्रलंबीत असून सुनावणीच्या अंतिम निर्णयामध्ये याबाबत कोणता निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे. The issue of road width is undecided