गुहागर, ता. 18 : तालुक्यातील लो. स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण यांच्या शैक्षणिक कार्याला शुभेच्छा देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळांनी भेट दिली. आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कौशल्य विकास, संगणक प्रशिक्षण अशा वेगवेगळ्या कोर्सेसने विद्यार्थ्याना रोजगार बाबत मार्गदर्शन संस्था देत आहे. The Director of Urban Bank visited Arekar Institute
यावेळी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मा.श्री.निहार गुढेकर, संचालक मा.श्री.प्रशांत शिरगावकर, संचालक मा.श्री.धनंजय खातू यानी लो.स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.साहिल प्रदिप आरेकर यांना शुभेच्छा दिल्या. The Director of Urban Bank visited Arekar Institute