• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्राध्यापकांची मारहाण पोचली विधानभवनात

by Guhagar News
December 21, 2024
in Guhagar
292 3
0
The beating of professors reached the Vidhan Bhavan
574
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार जाधव यांनी केली उच्‍चस्तरीय चौकशीची मागणी

गुहागर, ता. 21 : शहरातील उच्‍च महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचा विषय शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी थेट महाराष्‍ट्राच्या विधानभवनात मांडण्यात आला.  शुक्रवारी आमदार भास्कर जाधव यांनी विधानभवनात महाविद्यालयातील मारहाणीचा मुद्दा मांडला. त्याचप्रमाणे बुक्टूने आज (शनिवारी) मोर्चाची हाक दिली. या पार्श्र्वभुमीवर पोलीसांनी एका संचालकासह २ जणांना अटक केली आहे. शनिवारी (21 डिसेंबर) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. The beating of professors reached the Vidhan Bhavan

महाराष्‍ट्र राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरात सुरु आहे. याच दरम्यान बुधवारी 17 डिसेंबरला सकाळी 8.30 वा. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश भोसले, सचिव संदिप भोसले, रोहन भोसले आणि अन्य 4 ते 5 जणांनी प्रा. हिरगोंड, प्रा. भालेराव, प्रा. सानप आणि प्रा. जाधव यांना मारहाण केली. ही मारहाण झाल्यानंतर गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून तक्रार नोंदविण्यास विलंब सुरु होता. या दरम्यान मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय शिक्षक आणि विद्यार्थी संघटनेचे (बुक्टू) अध्यक्ष गुलाबराव राजे आणि सचिव चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आमदार भास्कर जाधव यांना पत्र पाठवले. याच पत्राचा आधार घेत आमदार जाधव यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा म्हणून प्राध्यापकांच्या मारहाणीचा मुद्दा सभागृहात मांडला. तसेच गुहागरमधील खरे ढेरे भोसले महाविद्यालयात सुरु असणारे गैरव्यवहार उघड करण्यासाठी उच्‍चस्तरीय समिती नियुक्‍त करण्याची मागणी केली आहे.  The beating of professors reached the Vidhan Bhavan

महाविद्यालयात तणाव दरम्यान मारहाणीची ही घटना महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी उपस्थित असताना घडली. मारहाण सुरु असताना महाविद्यालयातील अनेक विद्यार्थीनी रडत होत्या. विद्यार्थी महाविद्यालयाच्या वर्गातून बाहेर पडण्यास धजावत नव्हते. आजही हेच तणावाचे वातावरण महाविद्यालयात आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी महाविद्यालयात 10 ते 15 विद्यार्थीच आले होते. प्राध्यापक देखील तणावाखाली आहेत. The beating of professors reached the Vidhan Bhavan

मारहाणीच्या निषेधार्थ आज शनिवारी मोर्चा विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापकांना झालेली मारहाण ही पुरोगामी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील उच्चशिक्षण व्यवस्थेतील ही एकमेव दुर्दैवी घटना आहे. गुहागर सारख्या सुसंस्कृत शहरातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या संस्थाचालक आणि त्यांचे गुंड सहकारी यांच्या अमानवी आणि जीवघेण्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा आज शनिवार दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान गुहागर कॉलेज ते तहसीलदार कार्यालय काढण्यात येणार आहे. या मोर्चाला रत्नागिरी जिल्हा उच्च माध्यमिक संघटना, गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक समिती, समता सैनिक दल या संघटनानी पाठिंबा दिला आहे. या मोर्चात विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन बुक्टू संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजे व महासचिव प्रा. कुलकर्णी यांनी केले आहे. The beating of professors reached the Vidhan Bhavan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThe beating of professors reached the Vidhan BhavanUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share230SendTweet144
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.