मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा ८ रोजी
मुंबई, ता. 02 : राज्यात महायुतीची पहिली मोठी सभा ८ तारखेला होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महा युतीच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांचा नारळ फुटणार आहे. तर ५ नोव्हेंबरपासून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या राजकीय प्रचार दौऱ्याला रत्नागिरी जिल्ह्यातून सुरुवात करत आहेत. Thackeray’s first meeting in Ratnagiri
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलं असून एमेकांवर टीका-टिपण्णी व राजकीय फटाके फोडले जात आहेत. त्यातच, आता बड्या नेत्यांच्या सभांचीही तारीख व वेळ निश्चित केली जात आहे. ५ नोव्हेंबरपासून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या राजकीय प्रचार दौऱ्याला सुरुवात करत आहेत. उद्धव ठाकरेंची पहिली निवडणूक प्रचारसभा रत्नागिरी जिल्ह्यातून सुरु होईल. त्यानंतर, राज्यभरात त्यांच्या १५ सभा घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे. आता, राज्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या सभेची तारीख ठरली आहे. विधानसभा निवडणुकांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा निश्चित झाला असून नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येणार आहेत. धुळे शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या या सभेसाठी खान्देश गो शाळेच्या मैदानावर जय्यत तयारी सुरु झाली आहे. तब्बल ४५ एकरवर ही सभा होणार आहे. एक लाख नागरिक या सभेला येणार आहे. Thackeray’s first meeting in Ratnagiri
नरेंद्र मोदींनी त्यांच्या दौऱ्यात उत्तर महाराष्ट्राला २ सभा दिल्या आहेत. त्यापैकी, नाशिकला एक आणि धुळ्याला एक सभा होईल, मोदींच्या या दोन्ही सभा रेकॉर्ड ब्रेक होणार, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. नाशिकच्या ग्राउंडला तर मोदी ग्राउंड नाव दिले आहे, येथे लाखोंची सभा होणार आहे, असेही महाजन यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या प्रचारयंत्रणेत भाजपने केंद्रीयमंत्र्यांनाही उतरवले आहे. त्यामुळे, भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेल्या केंद्रातील नेत्यांच्याही सभा होणार आहेत. त्यातच, महाराष्ट्रात नरेंद्र मोदीसुद्धा जास्त वेळ देतील, नाशिकला अजिबात दुर्लक्ष केलं नाही. याशिवाय, धुळ्याला, नंदुरबारलाही जाणार आहेत. मोदींच्या सभांचं दौऱ्याचं नियोजन अहमदनगरसह ५ जिल्ह्यांत असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. Thackeray’s first meeting in Ratnagiri