• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ श्रीदेवी महामाई सोनसाखळी मंदिराचा कलशारोहण सोहळा

by Guhagar News
February 24, 2025
in Guhagar
120 1
0
Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal
235
SHARES
672
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील तवसाळ श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा शुक्रवार १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal

Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal

श्री महामाई सोनसाखळी देवीचा कलशारोहण सोहळ्यानिमित्त 14 फेब्रुवारी रोजी देवस्थानचे मानकरी राजेश रमेश सुर्वे यांचे घर ते महामाई मंदिर पर्यंत कलश मिरवणूक हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत, सनई ढोल ताशा पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये काढण्यात आली. रात्री स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 15 फेब्रुवारी रोजी शोडशोपचारे पूजन तसेच देवीला, रूपे लावण्याचा कार्यक्रम विधिवत करण्यात आला . सदर कार्यक्रमाला तालुक्यातील माहेरवाशीणी भक्तगण यांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. रात्री श्री भगवान लोकरे श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ भांडुप व श्री प्रमोद हरियाण श्री पावणादेवी प्रासादिक मंडळ घालवली, तालुका देवगड या सुप्रसिद्ध भजन सम्राटांची डबलबारी कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच देवस्थापना होम हवन, दुष्ट ओवाळणी व श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. रात्री तवसाळ पंचक्रोशीतील बहुरंगी नमन कार्यक्रम सादर करण्यात आला. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal

Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal

सदर कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांचा उत्साह वाढत होता. श्री महामाई सोनसाखळी मंदिराचा कलशारोहण सोहळा कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष, श्री मोहन गडदे सर्व पंच कमिटी व सर्व मान्यवर, ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमासाठी तवसाळ पंचक्रोशीतील मुंबई कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarTemple Kalasha Rohan ceremony at TavasalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.