श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा
गुहागर,ता. 12 : तालुक्यातील तवसाळ श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिराचा कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यानिमित्त शुक्रवार १४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सर्व कार्यक्रमास माहेरवाशीण, कुटुंबीय मित्रपरिवार व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि श्री देवी महामाई सोनसाखळीचे दर्शन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे यांनी केले आहे. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal


कलशारोहण सोहळ्यानिमित्त दि. 14 रोजी सकाळी 10 ते 2 वाजता कलश मिरवणूक (महामाई सोनसाखळीच्या गादीवरून राजेश रमेश सुर्वे यांचे घर ते महामाई सोनसाखळी देवी मंदिर) दुपारी 2 वाजता महाप्रसाद, रात्री 9 वाजता स्थानिक भजन व निमंत्रित येणारी भजने.
दि. 15 रोजी सकाळी 09 ते 12 वाजता शोडषोपचारे पूजन व देवींना रूप लावणे, दुपारी 12.30 ते 2 वाजता कलशारोहण सोहळा, दुपारी 2 वाजता महाप्रसाद, सायं 7 ते 10 वाजता स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे भजन, रात्री 10 वाजता डबलबारी.
दि. 16 रोजी सकाळी 10 ते 2 वाजता देव स्थापना होमवहन, दृष्ट ओवाळणी, दुपारी 2 वाजता महाप्रसाद, सायं 7 ते 10 वाजता स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे भजन, रात्री 10 वाजता निमंत्रित येणारी भजने.
दि. 17 रोजी सकाळी 10 ते 1 वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, दुपारी 2 वाजता महाप्रसाद, सायं 7 ते 10 वाजता स्थानिक पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भजन, रात्री 10.30 वाजता तवसाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बहुरंगी नमन हे कार्यक्रम साजरे होणार आहेत. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal


रत्नागिरी जिल्ह्यात २७ ग्रामदेवता आहेत. ज्यांना १०० वर्ष पूर्वी ब्रिटिश सरकारने ही या देवतांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याने त्यांना मानाचं ताम्रपट ( सनद) दिली आहेत. त्या देवस्थान पैकी श्री देवी महामाई सोनसाखळी देवी हे देवस्थान आहे. तवसाळ पंचक्रोशी ची श्रद्धा स्थान असणारी आणि समग्र माहेरवाशिणीची पाठीराखी आणि सर्वसामन्यांच्या हाकेला त्यांच्या नवसाला पावणारी प्राचीन आणि ऐतिहासिक देवता म्हणजे श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिर देवस्थान या देवीच्या नूतन मंदिरा चा कलशा रोहण सोहळा आयोजित करण्यात आहे. या उत्सवनिमित्त पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण सुरू आहे. श्री देवी महामाई सोनसाखळी ट्रस्ट चे वतीनं या संपूर्ण उत्सवाची सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. Temple Kalasha Rohan ceremony at Tavasal